तडीपार आरोपीला सहा महिन्यांचा सश्रम कारावास
By Admin | Updated: August 1, 2015 01:33 IST2015-08-01T01:33:56+5:302015-08-01T01:33:56+5:30
तडीपार व घरफोडीच्या प्रयत्नात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

तडीपार आरोपीला सहा महिन्यांचा सश्रम कारावास
अमरावती : तडीपार व घरफोडीच्या प्रयत्नात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भोला भीमराव मोरे (२१, रा. माताखिडकी) असे आरोपीचे नाव आहे.
माताखिडकी परिसरातील रहिवासी भोला मोरे या आरोपीला पोलीस आयुक्तांच्या आदेशाने १० सप्टेंबर २०१२ रोजी २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. मात्र, भोला माताखिडकी परिसरात फिरताना आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून २ एप्रिल २०१३ रोजी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (४) एम.ए. शीलार यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता आशा ठाकरे यांनी युक्तिवादानंतर भोला मोरेला ३ महिन्यांचा सश्रम कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
आरोपी भोला मोरे याने १४ सप्टेंबर २०१३ रोजी गडगडेश्वर परिसरातील बालाजी कॉलनीत घरफोडीचा प्रयत्न केला होता.