शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सलग सहा तास बचावकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

अचलपूर तालुक्यातील भूगाव येथून सन १९७५ मध्ये धारणीला आलेल्या सुधाकर ठाकरे यांनी ९० च्या दशकात पाच हजारांच्या भांडवलावर टिनाचा खोका विकत घेऊन मुख्य महामार्गालगत दुकान लावले. १९९३ मध्ये दुकानाला आग लागली. त्यातही प्रचंड नुकसान झाले. पुन्हा नातेवाईक व सहकाऱ्यांच्या मदतीने व्यवसाय उभा केला. सन २०१८ मध्ये दुकानाला मागील बाजूने आग लागली. लगेच आग विझवल्याने नुकसान टळले. शुक्रवारी धारणी शहराचा आठवडी बाजार व घुंगरू बाजार असल्याने लाखो रुपयांचा माल भरला. मात्र, पहाटेच्या आगीत सर्व काही जळून खाक झाले.

ठळक मुद्दे क्षणार्धात होत्याचे नव्हते, १०० मीटरवर पेट्रोलपंप, नागरिकांचे सहकार्य

  पंकज लायदे    लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : अख्खे धारणीकर गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास मुख्य ओळीतील दुकानांना आगीने वेढा घातला. सुरुवातीला १५ दुकाने खाक झाल्याचे दिसत होते. मात्र, तो आकडा तब्बल ३३ वर जाऊन पोहोचला. कोट्यवधींची साधनसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ती आग १०० मीटर अंतरावरील पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती, तर काय अनर्थ घडला असता, या विचारानेच धारणीकरांसोबत प्रशासकीय यंत्रणेची पाचावर धारण बसली. त्यामुळे सगळेच आग विझविण्यासाठी एकत्र आले. सलग सहा तास बचावकार्यानंतर हा अग्नितांडव आटोक्यात आला. मात्र, तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सजगतेने आगीची माहिती महसूल व नगरपंचायत यंत्रणेकडे पोहोचली. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह अख्खी यंत्रणा पहाटेच घटनास्थळी दाखल झाली. तातडीने संपर्क यंत्रणा राबविल्याने आगीवर उशिरा का होईना, नियंत्रण मिळविता आले. १९९३ नंतर पुन्हा आगीचा तडाखा अचलपूर तालुक्यातील भूगाव येथून सन १९७५ मध्ये धारणीला आलेल्या सुधाकर ठाकरे यांनी ९० च्या दशकात पाच हजारांच्या भांडवलावर टिनाचा खोका विकत घेऊन मुख्य महामार्गालगत दुकान लावले. १९९३ मध्ये दुकानाला आग लागली. त्यातही प्रचंड नुकसान झाले. पुन्हा नातेवाईक व सहकाऱ्यांच्या मदतीने व्यवसाय उभा केला. सन २०१८ मध्ये दुकानाला मागील बाजूने आग लागली. लगेच आग विझवल्याने नुकसान टळले. शुक्रवारी धारणी शहराचा आठवडी बाजार व घुंगरू बाजार असल्याने लाखो रुपयांचा माल भरला. मात्र, पहाटेच्या आगीत सर्व काही जळून खाक झाले. आता उभे राहायचे तरी कसे, असा ठाकरे यांचा आर्त सवाल काळीज भेदणारा होता. शुक्रवारच्या आगीमुळे अनेकांची आर्थिक घडीच कोलमडली.

आठवडाभर आगीची मालिकाआठवडाभरात पाच ठिकाणी आग लागली. धारणी शहरातील अन्नपूर्णा ज्वेलर्स,  कुसुमकोट येथील मालवीय यांचा गुरांचा गोठा, तर खापरखेडा येथील मोबीन खान याच्या शेतातील ऊस पिकाला आग लागली. गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास झिलांगपाटी येथे सिलूबाई सावलकर यांचे घर जळून खाक झाले.

 

टॅग्स :fireआगMelghatमेळघाट