सहा आरोपींची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST2021-07-05T04:09:54+5:302021-07-05T04:09:54+5:30

तिवसा : शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील हत्याप्रकरणातील सहा आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिवसा न्यायालयात हजर केले असता, सर्वांची ...

Six accused sent to jail | सहा आरोपींची कारागृहात रवानगी

सहा आरोपींची कारागृहात रवानगी

तिवसा : शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील हत्याप्रकरणातील सहा आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिवसा न्यायालयात हजर केले असता, सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावरील आशीर्वाद बारसमोर २६ जून रोजी अमोल पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी घटनेच्या दिवशीच चार आरोपींना व पुन्हा दोन आरोपींना अटक केली. या हत्याकांडातील सर्व सहा आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संदीप ढोबाळे, प्रवीण ढोबाळे, अविनाश पांडे, रूपेश घागरे, गुणवंत उमक, रूपेश पवार अशी नावे आहेत. दहा महिन्यांमध्ये तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Six accused sent to jail