शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी योजना घोटाळ्यातील दोषींवर एसआयटीची करडी नजर, लवकरच फौजदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:28 IST

आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे.

अमरावती - आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभाग कामाला लागला आहे. बुधवार, ११ जुलै रोजी अपर आयुक्त कार्यालयस्तरावर महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.  

माजी न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड समितीने ‘ट्रायबल’मध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी एकूण ४७६ दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस यापूर्वी राज्य शासनाकडे केली आहे. या घोटाळ्यात कारवाईपासून बचाव करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, आदिवासी योजनांमध्ये घोटाळेबाज अधिकाऱ्यांची हयगय नको, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्याअनुषंगाने माजी न्या.गायकवाड समितीच्या शिफारशींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी पी.डी. करंदीकर यांची समिती नेमली आहे. करंदीकर समितीच्या मदतीसाठी ‘एसआयटी’ने आदिवासी विकास विभागाच्या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयस्तरावर सेवानिवृत्त लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांकडे घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा सहायक प्रकल्प अधिकारी अशाप्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसात फौजदारी दाखल करताना आदिवासी योजनेत घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी एसआयटीचे पथक काम करीत आहे. तर, घोटाळाप्रकरणी चौकशी समितीप्रमुख माजी न्यायमूर्ती गायकवाड यांनी दोषी असलेल्या ४७६ अधिकाऱ्यांची यादी शासनाकडे अहवालाद्वारे सादर केली आहे. त्यामुळे यादीत दोषींची नावे ‘क्रॉस चेकींग’ करण्यासाठी एसआयटीने चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावरील प्रकल्पनिहाय सन २००३ ते २००९ या नऊ वर्षाच्या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकारी, लेखाधिकारी आदींची यादी मागविली आहे. त्यानुसार ‘ट्रायबल’ने यादी गोळा करण्याची जोरदार तयारी चालविल्याचे दिसून येते.अकोला प्रकल्पातील दोषींवर लवकरच फौजदारीआदिवासी योजना घोटाळ्यात ४७६ जणांचा समावेश असल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. यात पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, गडचिरोली व घोडेगाव (पुणे) येथील चार अधिकाऱ्यांवर पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात अकोला प्रकल्प कार्यालयांतर्गत दोषींवर फौजदारीची तयारी एसआयटीने चालविल्याची माहिती आहे. अकोला येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडे दोषींविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्याची जबाबदारी आहे.

एसआयटीचे मायक्रो प्लॅनिंगआदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी माजी न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांच्या शिफारशीनुसार दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष चौकशी पथकाने मायक्रो प्लॅनिंग चालविले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात सादर याचिकेच्या निर्णयाकडे एसआयटीचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हा