शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

साहेब, तो माझ्यासमोर दुसऱ्या महिला घरी आणतो हो! पोलिसांसमोर विवाहितेची आर्जव

By प्रदीप भाकरे | Updated: March 2, 2023 14:55 IST

Amravati News: साहेब, मी त्याची लग्नाची बायको असताना तो माझ्यासमोरच दुसऱ्या महिला घरी आणतो, त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या अशा या निर्लज्ज वागण्याने आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे. साहेब, त्याच्यावर कारवाई करा हो. ही आर्जव आहे एका विवाहितेची.

- प्रदीप भाकरेअमरावती : साहेब, मी त्याची लग्नाची बायको असताना तो माझ्यासमोरच दुसऱ्या महिला घरी आणतो, त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या अशा या निर्लज्ज वागण्याने आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे. साहेब, त्याच्यावर कारवाई करा हो. ही आर्जव आहे एका विवाहितेची. त्याने आपल्यामागे घटस्फोटाचा तगादा लावल्याचेही विवाहितेचे म्हणणे आहे.

१ मार्च रोजी सकाळी एक महिला शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तिची फिर्याद घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याने देखील तिला धीर दिला. तथा तिचा पती सचिन निवृत्ती शिंदे, एक महिला, सुभाष देसाई व विलास देसाई या चौघांविरूध्द पोलिसांनी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. येथील एका तरूणीचे मे २०१२ मध्ये सांगली जिल्ह्यातील सचिन शिंदेसोबत विवाह झाला. काही दिवस सासरी काढल्यानंतर तो पत्नीच्या माहेरी येऊन घरजावई राहू लागला. येथे राहत असताना तो सतत पत्नीला दारू पिऊन मारहाण करायचा. तथा सासु सासऱ्यांनी दारू पिण्यास पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यावेळी देखील तो तिला फारकतीची मागणी करायचा. दरम्यान त्याने नोव्हेंबर २०१५ मध्ये तिचा गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला. आपल्या दुसऱ्या प्रसुतीचा खर्च न करता तो उलटपक्षी आपल्या आईवडिलांनाच गाडी घेण्याकरीता दोन लाख रुपये मागायचा, असे विवाहितेने म्हटले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तो त्याच्या सांगली जिल्ह्यातील गावात निघून गेला. दुसऱ्या महिलांचे फोटो स्टेटसवरआरोपी पती हा नेहमी दुसऱ्या महिलांना घरी आणतो, त्यांच्या सोबत राहतो. आपल्याला नेहमी फारकत मागतो, फोनवर सतत मारण्याची धमकी देतो. सोबतच त्याचे दोन मामा देखील त्याला फारकत घेण्यासाठी प्रवृत्त करतात, असा विवाहितेचा आरोप आहे. एवढेच कायतर आरोपी पती हा त्याच्या सोशल मिडियावर दुसऱ्या महिलांची त्याच्यासोबतची छायाचित्रे डीपीवर ठेवतो. त्याला त्याबाबत विचारणा केली असता, तो घातपात घडवून आणण्यासह मुलांना सोबत घेऊन जाण्याची धमकी देत असल्याचे विवािहतेने म्हटले आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपFamilyपरिवारAmravatiअमरावती