सिपना, गडगा नदी कोरडीठण्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:28 IST2019-02-16T22:27:50+5:302019-02-16T22:28:13+5:30
मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे.

सिपना, गडगा नदी कोरडीठण्ण
श्यामकांत पाण्डेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे.
मेळघाटातच उगम आणि याच प्रदेशात वाहणाºया गडगा आणि सिपना नदी मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. या दोन्ही नद्यांचे उगम चिखलदरा तालुक्यात आहेत आणि धारणी तालुक्यातील तापी नदीमध्ये त्या विसर्जित होतात. यादरम्यान येणाºया अनेक गावांतील दैनंदिन गरजा भागविण्याचे काम तापी आणि सिपना नदी अविरतपणे करीत आलेली आहे. या दोन्ही नद्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेले आहेत. परंतु, सिंचन विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे या नदीचे पात्रात पाणी अडविण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे मेळघाटातील जंगलातील वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांनासुद्धा यावर्षी भीषण त्रास होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणीही या नद्यांमधील पाण्यानी तृष्णा भागवतात. मात्र, उन्हाळा लागण्यापूर्वीच नद्या कोरड्या पडल्याने वन्यप्राणी गावांकडे येण्याची भीती व्यक्त होत आहे. हिवाळा संपायला १३ दिवस शिल्लक असतानाच मेळघाटात भीषण पाणीटंचाईची चाहूल लागली आहे.
ही गावे अवलंबूृन
तालुक्यातील सिपना, खापरा, खंडू, दवाल, तापी, गडगा या प्रमुख नद्यांवर शकुपाटी, धारणमहू, ढाकरमल, निरगुडी, चेथर, केकदा, चटवाबोड, काटकुंभ, बुलुमगव्हाण, कसाईखेडा, भोंडीलावा, बैरागड, कुटंगा, रंगुबेली, हरदा, सावलखेडा, पोहरा, हरदोली, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, चिपोली, पाटीया, तांगडा, आठनादा, दुनी, बाजारढाणा, काकरमल, रोहणीखेडा, दाबीदा, अंबाडी, नागुढाणा, खारी, झिल्पी, साद्राबाडी, गौलानडोह, सुसर्दा, राणापीसा, लाकटू, डाबका, सावलीखेडा, नागझीरा, धुळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, दादरा, भंवर, रेहट्या, नारदू, गोलई, शिवाझिरी ही गावे अवलंबून आहेत.