नऊ लाख लोकसंख्येच्या शहरात सेप्टिक टॅंक सफाईकरिता एकच वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST2021-04-21T04:13:52+5:302021-04-21T04:13:52+5:30

अमरावती : महानगराची लोकसंख्या ही जवळपास नऊ लाखांच्या घरात पोहोचली आहे. एकीकडे ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ असे दिवास्वप्न नागरिकांना ...

A single vehicle for septic tank cleaning in a city of nine million people | नऊ लाख लोकसंख्येच्या शहरात सेप्टिक टॅंक सफाईकरिता एकच वाहन

नऊ लाख लोकसंख्येच्या शहरात सेप्टिक टॅंक सफाईकरिता एकच वाहन

अमरावती : महानगराची लोकसंख्या ही जवळपास नऊ लाखांच्या घरात पोहोचली आहे. एकीकडे ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ असे दिवास्वप्न नागरिकांना दाखविले जाते. मात्र, शहरात सेप्टिक टँक सफाईकरिता एकच वाहन असल्याने नागरिकांना शुल्क भरल्यानंतरही १५ ते २५ दिवस ‘त्या’ वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. या महत्त्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष चालविल्याचे वास्तव आहे.

शासन-प्रशासनाने घरोघरी शौचालय निर्मितीचे उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यामुळे अमरावती महानगरात ६० ते ७० टक्के नागरिकांच्या घरी शौचालय असल्याची माहिती आहे. काही नागरिकांकडे २० ते २५ वर्षापृूर्वीचे शौचालय बांधण्यात आले आहे. विशेषत: अंबागेट, जवाहरगेटच्या आतील भागातील नागरिकांकडील शौचालयाचे सेप्टिक टँक सफाई करण्यासाठी अलीकडे धावाधाव सुरू झाली आहे. परंतु, महापालिका अधिनस्थ सेप्टिक टँक सफाईसाठी एकच वाहन असल्यामुळे एक हजार रुपये शु्ल्क भरल्यानंतरही महिनाभर टँक सफाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एरवी महापालिकेत अधिकारी, लोकप्रतिनिधी अन्य वाहनांच्या खरेदीसाठी स्पर्धा करीत असताना, सेप्टिक टँक सफाई वाहनांच्या खरेदीसाठी पुढाकार का घेतला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केलेे जात आहे. शारदानगर, रविनगर, बियाणी चौक, साईनगर, राजापेठ आदी भागांतील नागरिकांची सेप्टिक टँक सफाईसाठी वाहन मिळत नसल्याची ओरड आहे. नियमानुसार शुल्क अदा केल्यानंतर तीन दिवसांत सेप्टिक टँक सफाई होणे आवश्यक आहे.

---------------

झोननिहाय सेप्टिक टँक वाहन का नाही?

महापालिका प्रशासनाचा कारभार हा पाच झोनमधून चालतो. मात्र, अमरावती महानगरासाठी एकच वाहन अशी नियमावली आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दर तीन ते चार वर्षांनी नवेकोरे वाहन घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधींना सेप्टिक टँक वाहन खरेदीसाठी पुढाकार घेतला नाही, याचे आश्चर्य आहे. पाचही झोननिहाय सेप्टिक टँक वाहन खरेदी करावे, अशी मागणी आहे.

------------------

वाढत्या लोकसंख्येनुसार सेप्टिक टँक सफाईसाठी पुरेशा प्रमाणात वाहने हवी आहेत. कोरोना आणि इतर काही कारणांनी याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, येत्या काळात सेप्टिक टँक सफाई वाहनांच्या खरेदीसाठी पुढाकार घेतला जाईल.

- प्रशांत रोडे, आयुक्त. महापालिका.

-----------------

महानगरात किमान चार वाहने सेप्टिक टँक सफाईकरिता असावेत. या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष झाले, हे खरे आहे. मात्र, याबाबत बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेणार असून, पत्र देऊन लवकरच वाहने खरेदी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.

- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता

Web Title: A single vehicle for septic tank cleaning in a city of nine million people