गीतगायन स्पर्धेने मोर्शीकरांना रिझविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST2021-02-21T04:24:39+5:302021-02-21T04:24:39+5:30

मोर्शी : स्थानिक इंद्रधनु कला अकादमीच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...

The singing competition resonated with Morshikar | गीतगायन स्पर्धेने मोर्शीकरांना रिझविले

गीतगायन स्पर्धेने मोर्शीकरांना रिझविले

मोर्शी : स्थानिक इंद्रधनु कला अकादमीच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्थानिक मंगल कार्यालयात झालेल्या हिंदी-मराठी गीतगायन स्पर्धेत जवळपास १५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी ऑफलाईन, ऑनलाईन ऑडिशन दिली होती. त्यापैकी ३९ स्पर्धकांची उपांत्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दहा स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती

अमरावतीची प्रगती गुडघे, अकोल्याचा तेजस कडू व अकोटचा भारत अंभोरे यांना अनुक्रमे ११ हजार १, ७ हजार १ व ५ हजार १ रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. सहभागी सात स्पर्धकांना २१०० रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यात किरण ठाणेकर (वरूड), तन्वी मोहोड (चांदूर बाजार), राणी पवार (नागपूर), सोनिया दुधाने (दर्यापूर), महेश भेंडे (हिवरखेड), प्रवीण इंगोले (नागपूर), दिनेश शेंडे (बडनेरा) यांचा समावेश होता. या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण मोर्शीच्या नगराध्यक्ष मेघना मडघे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका छाया ढोले, जगदीश जयस्वाल, विनोद अजमिरे, डॉ. शिल्पा पाटील, सुरेश हटवार उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक राजेश उमाळे, वामनराव याऊल, शिल्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

------------

Web Title: The singing competition resonated with Morshikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.