ज्युनिअर, सिनियर महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गायन स्पर्धा
By Admin | Updated: December 20, 2015 00:11 IST2015-12-20T00:11:33+5:302015-12-20T00:11:33+5:30
अंगभूत असलेल्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि युवा मनाला योग्य नेतृत्व देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट ...

ज्युनिअर, सिनियर महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गायन स्पर्धा
व्हाईस आॅफ अमरावती : लोकमत युवा नेक्स्ट आणि रायसोनी ग्रुपचा उपक्रम
अमरावती : अंगभूत असलेल्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि युवा मनाला योग्य नेतृत्व देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी कटीबद्ध असलेले रायसोनी गृप आॅफ र्इंस्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन (सीनीयर व ज्यूनिअर) युवक युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा व्हॉईस आॅफ अमरावती आयोजित केली आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ डिसेंबर २०१५ रोजी स्थानिक टाऊन हॉल येथे दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी दिलेल्या फोन नंबर्सवर नोंदणी करावी. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या २० ते २२ स्पर्धकांना अंतिम फेरीत गाण्याची संधी मिळेल. याद्वारे रायसोनी व्हाईस आॅफ अमरावती २०१६ ची निवड करण्यात येणार आहे.
अतिशय चुरशीच्या ठरणाऱ्या अशा स्पर्धांना नेहमीच युवक युवतींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. याही स्पर्धेत जास्तीत जास्त युवा कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अंतिम स्पर्धा ही २३ डिसेंबर रोजी स्व. केशवराव भोसले सभागृहात दुपारी ४.३० वाजता पार पडणार आहे.
या निमित्ताने गीत संगीताची मेजवानी समस्त रसिकांना मिळणार आहे. एकूणच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कलेला जोपासण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून होणार आहे. अंतिम स्पर्धेला सर्व लोकमत वाचकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता संपर्क ८९५६५४४४४८, ९८५०३०४०८७ या क्रमांकावर साधता येईल. (प्रतिनिधी)