नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:49+5:302020-12-31T04:13:49+5:30
अमरावती : नववर्षाचे स्वागताला नागरिकांनी घराबाहेर न पडता साधेपणाने साजरे करा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन ...

नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करा
अमरावती : नववर्षाचे स्वागताला नागरिकांनी घराबाहेर न पडता साधेपणाने साजरे करा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले व याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ६० वर्षांवरील नागरिकांनी व १० वर्षांवरील मुलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर निघणे टाळावे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात, अशा ठिकाणी एकाचवेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सचे पालन करावे, आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. फटाक्याची आतषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनीप्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत.