शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अमरावतीच्या आरटीओत सन्नाटा, ‘तो’ दलाल पसार, तीन अधिकारी अटकेत

By गणेश वासनिक | Updated: May 3, 2024 22:08 IST

चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी प्रकरण, १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती

अमरावती : चाेरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी येथील आरटीओच्या गुडबुकमध्ये असलेला ‘तो’ दलाल पसार झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमरावती येथील तीन आरटीओंच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी अटक केली आहे. आतापर्यंत अमरावती आरटीओत १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणाशी निगडीत आठ वाहनांचे थेट कनेक्शन असलेला दलाल याचा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.अरुणाचल, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली आणि हरयाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे अमरावती, नागपूर येथील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने हा गोरखधंदा सुरू होता. विशेष दलालांमार्फत चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करताना ते ट्रक अमरावती आरटीओत प्रत्यक्षात कधीच हजर राहत नव्हते. मात्र, ॲपवर ऑनलाइन नोंदणी दर्शविली जात होती. त्यामुळे ‘त्या’ दलालांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना ‘जी फॉर्म’ म्हटले की, डोळेझाक करून हे चोरीचे वाहन नोंदणी केले जात होते. यात आरटीओतील कार्यालयीन कर्मचारी ते आरटीओ अधिकारी अशी साखळी असल्याची माहिती आहे.

...असे उघड झाले अमरावती, नागपूर आरटीओ कनेक्शननवी मुंबई गुन्हे शाखेने ४ मार्च २०२४ रोजी मुंबई येथील ट्रक टर्मिनल परिसरात धाडसत्र राबविले. येेथे संशयास्पद ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम १५६७ आणि एमएच ४० सीएम ३०९८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनांचे चेसीस, इंजीन क्रमांकाची तपासणी केली असता या वाहनांचे मालक कमलेश गोपाल मंगे व नीरव ठक्कर हे असल्याचे पुढे आले. त्यामुळे या दोघांनाही मुंबई येथील बेलापूर पोलिस ठाण्यात चाैकशीसाठी बोलावले असता ही वाहने सचिन नवघणे आणि जावेद मणीयार यांना विकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी टाटा कंपनीच्या तज्ञ्जांकडून या वाहनांची तपासणी केली. ही वाहने बाहेरून टाटा कंपनीची असली तरी या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करण्यात आली, असा धक्कादायक अभिप्राय टाटा कंपनीच्या तज्ञ्जांनी दिला. मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर ही वाहने अमरावती, नागपूर आरटीओत नोंदणी झाल्याचे उघडकीस आणले. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहा सदस्यीय पथक २४ एप्रिल रोजी नागपूर आरटीओत चौकशीसाठी आल्याची माहिती आहे.

मुंबईत बयानासाठी बोलावले, आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटकनवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी नागपूर येथील आरटीओ कार्यालयात १७ एप्रिल रोजी आले होते. याप्रकरणाशी संबंधित अमरावती येथील आरटीओ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ३० एप्रिल रोजी बयाण नोंदविण्यासाठी मोटर वाहन निरीक्षक गणेश वरूठे, सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील आणि सहायक मोटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके यांना बोलावले असता तिघांंनाही मुंबईत अटक केली. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती