विद्यापीठ, महाविद्यालयांचे ‘नॅक’ लांबणीवर पडण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:43+5:302021-03-04T04:21:43+5:30

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोेगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ‘नॅक’मूल्यांकन बंधनकारक केले आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी अधूनमधून सुरूच आहे. ...

Signs of ‘NAC’ extension of universities, colleges | विद्यापीठ, महाविद्यालयांचे ‘नॅक’ लांबणीवर पडण्याचे संकेत

विद्यापीठ, महाविद्यालयांचे ‘नॅक’ लांबणीवर पडण्याचे संकेत

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोेगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ‘नॅक’मूल्यांकन बंधनकारक केले आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालयांचे नियमित कामे खोळंबली असून, याचा ‘नॅक’ मू्ल्यांकनावर परिणाम होण्याचे संकेत आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने २९ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, उच्च शिक्षण संस्थांचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून विद्यार्थी, शैक्षणिक उपक्रम आदींसाठीच्या पायाभूत सुविधांची तपासणी बंधनकारक केले आहे. महाविद्यालये अथवा उच्च शिक्षण संस्थांनी ‘नॅक’ मूल्यांकन केले नाही, तर अशा संस्थांचे अनुदान बंद करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत यूजीसीने दिले आहेत. परंतु, अमरावती विभागात लॉकडाऊन, संचारबंदी सुरूच आहे. महाविद्यालये बंद असून, नियमित कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘नॅक’ची तयारी कशी करावी, असा प्रश्न विद्यापीठ आणि महाविद्यालयांसमोर उपस्थित झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकन मे महिन्यात होणार आहे. यूजीसीने तशा सूचना दिल्याची माहिती आहे. मात्र, गतवर्षीच्या मार्चपासून आतापर्यंत कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. परीक्षा, प्रवेश, निकाल आदी बाबी विस्कळीत झाल्या आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अनुदानित १५२ पैकी ३३ महाविद्यालयांनी अद्यापही ‘नॅक’ मूल्यांकन केलेले नाही. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार होती. मात्र, कोरोना संसर्ग वाढला आणि लॉकडाऊन घोषित झाले. विद्यापीठ, महाविद्यालयांना ‘नॅक’ मू्ल्यांकनाची पूर्वतयारी करताना कोरोनाचा बाधा येत आहे.

----------------

विनाअनुदानित महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकनाची जबाबदारी विद्यापीठाची आहे. अनुदानित महाविद्यालयांचा ‘नॅक’ मू्ल्यांकनासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. कोरोना संसर्गाची स्थिती बिकट होत असून, याचा ‘नॅक’वर परिणाम होईल, असे दिसून येते.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण, अमरावती.

Web Title: Signs of ‘NAC’ extension of universities, colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.