विद्यापीठाचे ‘नॅक’मू्ल्यांकन लांबण्याचे संकेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST2021-05-06T04:14:00+5:302021-05-06T04:14:00+5:30
अमरावती : देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय ...

विद्यापीठाचे ‘नॅक’मू्ल्यांकन लांबण्याचे संकेत?
अमरावती : देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती परिषद (नॅक) चमूकडून मे महिन्यात होऊ घातलेली तपासणी लांबण्याचे संकेत आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने ‘नॅक’च्या अनुषंगाने तयारी पूर्ण केली आहे. सेल्फ स्डटी रिपोर्ट (एसएसआर) देखील ऑनलाईन पाठविण्यात आला आहे.
दर पाच वर्षांनी विद्यापीठांना ‘नॅक’ मूल्यांकन बंधनकारक आहे. त्याकरिता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमूकडून हे मूल्यांकन केले जाते. तत्पूर्वी शैक्षणिक संस्थांना दिल्ली येथे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआर पाठवावा लागतो. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आजतागायत तो कायम आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचे डिसेंबर २०२० मध्ये होणारे ‘नॅक’ मूल्यांकन होऊ शकले नाही. परंतु, कुलगुंरुच्या पुढाकाराने ‘नॅक’ मूल्यांकनासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून ‘नॅक’ची तयारी पूर्ण करण्यात आली. विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे एसएसआर पाठविण्याची डेडलाईन ६ मे २०२१ होती. तथापि, २९ एप्रिल २०२१ रोजी विद्यापीठाने एसएसआर पाठविला आहे.
------------------------
विद्यापीठाने ‘नॅक’ मू्ल्यांकनाची तयारी पूर्ण केली आहे. विद्यापीठ अनुदान आयाेगाकडे एसएसआर पाठविला आहे. डे टू डे कामकाज सुरू आहे. आता केवळ ‘नॅक’ चमूकडून तारखेची प्रतीक्षा आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
--------------------