विद्यापीठात बजेटची सिनेट सभा रद्द होण्याचे संकेत, २२ संक्रमित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:14+5:302021-02-26T04:18:14+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची वाटचाल कोरोना ‘हॉट स्पॉट’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. बुधवारी (दि. २४) १०५ ...

विद्यापीठात बजेटची सिनेट सभा रद्द होण्याचे संकेत, २२ संक्रमित रुग्ण आढळले
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची वाटचाल कोरोना ‘हॉट स्पॉट’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. बुधवारी (दि. २४) १०५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, त्यांपैकी २२ जण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत; त्यामुळे १२ मार्च रोजी होऊ घातलेली बजेटची सिनेट सभा रद्द होण्याचे संकेत आहेत.
विद्यापीठाच्या प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची सामूहिक चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी १०५ तर, गुरुवारी ९८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती आहे. शुक्रवारी पुन्हा कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विद्यापीठाचा परीक्षा आणि लेखा विभागात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळली आहे. त्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यापीठात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे.
बुधवारी घेण्यात आलेल्या १०५ नमुन्यांमध्ये २२ रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. पुढे दोन दिवसांत पॉझिटिव्ह संख्या वाढण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. त्यामुळे १२ मार्च रोजी होऊ घातलेली बजेटची सिनेट सभा पुढे ढकलण्याचे संकेत आहेत.
--------------------
दोन दिवसात २०३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली. त्यांपैकी गुरुवारी २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून, आज, शुक्रवारी पुन्हा चाचणीसाठी विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. सिनेट सभेच्या आयोजनाबाबत कुलगुरू निर्णय घेतील.
- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ