तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन
By Admin | Updated: July 11, 2015 01:37 IST2015-07-11T01:37:54+5:302015-07-11T01:37:54+5:30
सलगा तीन दिवस संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात नागरिकांना बिबटचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन
विद्यापीठ परिसर : विद्यार्थ्यांमध्ये दहशत, सावध राहण्याचे आवाहन
अमरावती : सलगा तीन दिवस संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात नागरिकांना बिबटचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने सकाळ व सायंकाळ त्या भागात फिरण्यास मनाई केली असून सावधगीरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
वडाळी वनपरीक्षेत्रात ५-६ बिबट असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. गेल्या काही महिण्यात अरमावती शहरालगतच्या परिसरात अनेकदा बिबट दृष्टीसही पडला आहे. बिबटने आजपर्यंत नागरिकांवर हल्ला केला नाही. मात्र वन्यप्राणी बिबटचा वावराने नागरिक धास्तावले आहेत.
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्या बंगल्या मधील परिसरात दोन महिण्यापूर्वी बिबट आढळून आला होता. आता पुन्हा सलग तीन दिवसापासून बिबटचा वावर आढळुन आल्योन दहशत निर्माण झाली आहे. विद्यापीठातील मुलीच्या वस्तीगृहा मागील परिसरात बुधवारी सकाळी काही विद्यार्थिना बिबट आढळून आला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता व शुक्रवारी पुन्हा सकाळी ११ वाजता बिबट नाल्या शेजारीला परिसरात फिरताना आढळुन आला आहे. बिबटचा वावर सुरु झाल्योन बुधवार पासुन शिकारी प्रतिबंधक पथकाचे अमोल गावनेर, सतीष उमक, मोज ठाकुर, अमीत शिंदे, यांनी पाळत ठेवणे सुरु केले आहे. अद्यापर्यंत बिबट असल्याचे पुरावे पथकाला मिळाले नाहीत मात्र प्रत्यक्षदर्शीच्या सागण्यावरुन बिबट असल्याची पुष्टी होत आहे.
अनेकांनी पाहिला बिबट
बुधवारी सकाळी एक विद्यार्थी विद्यापीठ परिसरातून दुचाकीने जात असताना अचानक बिबट रस्ता ओलांडतांना आढळुन आला. ही बाब अन्य नागरिकांना माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी बिबट पाहण्यासाठी मागोवा घेतला तेव्हा नाल्यापलीकडील भागात तब्बल ५० जणांनी प्रत्यक्ष बिबट बघीतला.
अर्धवट भिंतीवरुन बिबट्याचा प्रवेश
वन्यप्राणी विद्यापीठ परिसरात प्रवेश करीत असल्यामुळे विद्ेयापीठ प्रशासनाने परिसराच्या शेवटी भीतींचे बांधण्याचे काम सुरु केले. सद्यस्थितीत भींतीचे काम पुर्णत्वाकडे आहे. मात्र एका ठिकाणी अद्यापही भीती बांधणयाची जागा खुली आहे. त्यामुळे तेथुनच बिबटने विद्यापीठात प्रवेश केल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगीतले.
अर्धवट वॉल कम्पाऊंट मधून प्रवेश
जंगलातील वन्यप्राणी विद्यापीठ परीसरात प्रवेश करतात. त्यामुळे विद्यापीठ परिसराला भीतीचे कम्पाऊंड लावण्यात आले आहे. विद्यापीठ परिसराला भिंतींचा वेढा घालण्यात आला आहे. मात्र एका ठिकाणी अर्धवट भिंत असल्यामुळे बिबट तेथुन विद्यापीठात प्रवेश करीत आहे.