शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘संकल्प’च्या सामूहिक विवाह सोहळ्यात ७१ जोडप्यांचे शुभमंगलम्‌

By गणेश वासनिक | Updated: June 17, 2023 16:37 IST

वधु-वरांना माहेरची भेटवस्तू प्रदान; गरीब, सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना मोठा दिलासा

अमरावती : येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शुक्रवारी पार पडलेल्या आंतरजातीय सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ७१ जोडपी विवाहबद्ध झालेत. यावेळी उद्योजक नितीन कदम, नीशा कदम यांनी वधु-वरांना माहेरची भेटवस्तू प्रदान करीत कन्यादान केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात वऱ्हाडींनी एकच गर्दी केली होती.

बडनेरा मार्गालगतच्या जाधव पॅलेस येथे विवाह सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पुसदच्या कासोळा येथील महर्षी मातंग ऋषी धर्मपीठाचे सद्‌गुरू गजानंद माऊली तर उद्‌घाटक म्हणून नितीन कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, भदंत श्रीपाद थेरो, मानवी हक्क अभियानाचे उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, गजानन रडके, समीर देशमुख, गणेशदास गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रकाश खरूले, नयन मोंढे, विनोद मोदी, राम नवाथे, जीवन गायकवाड, राणी कदम, पूनम खडसे, चंदा बोडसे, दिनेश मेश्राम, प्रवीण सावळे, संजय ठाकरे, मिलिंद बांबल, डॉ. रूपये खडसे, मनजीत सिंग, गोंविद कासट आदी उपस्थित होते. या विवाह साेहळ्यात वऱ्हाडींसाठी जेवनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली हाेती. त्या-त्या धर्माच्या विधीनुसार ७१ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले. यात हिंदू, बौद्ध धर्मीय जोडप्यांची संख्या अधिक होती.

देशाभिमान जागविला

सामूहिक विवाह सोहळ्यात विधीवत चालिरीतीनुसार वधु- वरांचे लग्न आटोपताच सामूहिक राष्ट्रगीताचे गायन झाले. विवाह सोहळ्यात वधू-वरांची जात, धर्म, पंथ वेगवेगळे असले तरी राष्ट्र अगोदर हा संदेश देताना राष्ट्रगीत गायनाने देशाभिमान जागविला, हे विशेष. नितीन कदम यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्नAmravatiअमरावती