श्री मज्जिनेंद्र वेदी प्रतिष्ठा महामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST2021-02-21T04:24:30+5:302021-02-21T04:24:30+5:30

शिरजगाव कसबा : जैन समाजाचे गिरनार उपसर्ग विजेता मुनीश्री १०८ प्रबलसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री मज्जिनेंद्र ...

Shri Majjinendra Vedi Prestige Grand Festival | श्री मज्जिनेंद्र वेदी प्रतिष्ठा महामहोत्सव

श्री मज्जिनेंद्र वेदी प्रतिष्ठा महामहोत्सव

शिरजगाव कसबा : जैन समाजाचे गिरनार उपसर्ग विजेता मुनीश्री १०८ प्रबलसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री मज्जिनेंद्र वेदी प्रतिष्ठा महोत्सव पार पडला.

शिरजगावात जैन समाजाचे तीर्थक्षेत्र श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. यामुळे देशभरातून जैन समाजाचे भाविक दर्शनार्थ येथे येत असतात. या मंदिराला १००० वर्षांची पार्श्वभूमी असल्यामुळे पौराणिक महत्त्व आहे. महोत्सवामध्ये जिनाज्ञा, गुरुआज्ञा, जीनवाणी पूजन व नगर शोभायात्रा काढण्यात आली. नंतर जीनबिंब स्थापना करण्यात आली. महोत्सवामध्ये सिनेअभिनेता शशांक उदापूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सरपंच प्रवीण खेरडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनोहर सुने, अनिता पोहरे, सुकांत मांडवगडे, चंदन पवार, संजय झिंगरे, नीलेश पारधी, विजय वडनेरकर यांचा सत्कार करण्यात आला. संजय व्यास, अभय आगरकर, विलास बंड, अनिल सावळकर, राजेंद्र बंड, चंद्रशेखर सावळकर, कांचन नांदेडकर यांचे सहकार्य लाभले.

------------

Web Title: Shri Majjinendra Vedi Prestige Grand Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.