चिखलदऱ्यातील श्री देवी मंदिर चैत्र यात्रा यंदा रद्द.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:46+5:302021-04-10T04:12:46+5:30

फोटो पी ०९ चिखलदरा देवी चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध देवी पॉइंट येथे विदर्भातील लाखो ...

Shri Devi Mandir Chaitra Yatra in Chikhaldarya canceled this year. | चिखलदऱ्यातील श्री देवी मंदिर चैत्र यात्रा यंदा रद्द.

चिखलदऱ्यातील श्री देवी मंदिर चैत्र यात्रा यंदा रद्द.

फोटो पी ०९ चिखलदरा देवी

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध देवी पॉइंट येथे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व आदिवासींच्या आराध्य दैवत असलेल्या मंदिरात दरवर्षी भरणारी चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन व. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाला अनुसरून तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी श्री अंबादेवी संस्थान, अमरावती द्वारा संचालित चिखलदरा येथील श्री देवी मंदिर देवी पॉईंट, येथील चैत्र शुध्द प्रतिपदा. १३ ते २१ एप्रिलपर्यंत होणारा चैत्र नवरात्रोत्सव व यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्री अंबादेवी संस्थान, अमरावती विश्वस्त मंडळाने घेतला आहे. ही देवी चिखलदरा, मेळघाटसह विदर्भ व मध्यप्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत आहे.

बॉक्स

प्रसिद्ध नवसाची यात्रा

आदिवासीच्या आराध्य दैवत असल्याने चैत्र महिन्यात भरणाऱ्या यात्रेत हजारो बोकडांचा बळी दिला जातो. त्यानंतर गावकरी व कुटुंबातील सहकारी येथे भोजन पंगती करतात. आदिवासींमध्ये नवस फेडण्याची पारंपरिक प्रथा आहे. राज्य शासनाने त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत बंदी आणली असली तरी आजही आदिवासी पूजापाठ करून काही गावांमध्ये तर काही येथेच तो नवस फेडतात. मात्र यंदा यात्रा रद्द झाल्याने कबूल केलेला नवस यंदा त्यांना भेटता येणार नाही.

कोट

चिखलदरा येथील चैत्र महिन्यात भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला माहिती दिली आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रसार व गैरसोय टाळण्यासाठी न येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- माया माने,

तहसीलदार, चिखलदरा

Web Title: Shri Devi Mandir Chaitra Yatra in Chikhaldarya canceled this year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.