शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अमरावतीमध्ये श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह ३० नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:25 IST

विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते आणि आ. रामदास आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होईल. अध्यक्षस्थानी संस्थानच्या अध्यक्ष विद्या देशपांडे राहतील. याच दिवशी सायंकाळी साडेसहाला विदुषी सानिया पाटणकर (पुणे) आणि रात्री ८ वाजता पं. धनंजय जोशी (नांदेड) गायन सादर करतील. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सहाना बॅनर्जी (कोलकाता) यांचे सतारवादन होईल. रात्री ८ वाजता गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे जावई पं. रमाकांत गायकवाड (पुणे) हे ठुमरी टप्पा दादरा गायन सादर करतील. या दोन्ही मैफलींना ईशान घोष यांची तबला संगत राहील. २ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता पं. सुखदेव चतुर्वेदी (मुंबई) यांचे ध्रुपद गायन होईल. रात्री ८ वाजता पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने समारोहाचे समापन होईल. या नि:शुल्क आनंददायी सोहळ्याला उपस्थित राहून अमरावतीकरांनी अभिजात संगीताचा आनंद लुटावा, असे आवाहन श्रीअंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थान