पाळा येथेे ‘श्रावण बाळ, संजय गांधी योजना आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:04 IST2021-08-02T04:04:19+5:302021-08-02T04:04:19+5:30

फोटो - मोर्शी १ पी मोर्शी : आमदार देवेंद्र भुयार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार यांच्या पुढाकाराने ‘श्रावण ...

‘Shravan Bal, Sanjay Gandhi Yojana at your door’ | पाळा येथेे ‘श्रावण बाळ, संजय गांधी योजना आपल्या दारी’

पाळा येथेे ‘श्रावण बाळ, संजय गांधी योजना आपल्या दारी’

फोटो - मोर्शी १ पी

मोर्शी : आमदार देवेंद्र भुयार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार यांच्या पुढाकाराने ‘श्रावण बाळ, संजय गांधी योजना आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.

कोरोनामुळे शासकीय कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांनाश्रावण बाळ व संजय गांधी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आ. भुयार यांनी अपंग बांधव, विधवा व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेकरिता हा उपक्रम राबविला. यावेळी सरपंच अजय राऊत, उपसरपंच चंपत नेवारे,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके,पोलीस पाटील सागर साठे, सुरेश कुकडे, विलास राऊत, रोशन राऊत, किसनराव निस्वादे, महादेव सातपाने, सचिव भातुरकर, तलाठी सावरकर, गोविंदराव हजारे, संजय गट्टाणी तसेच शिक्षक, मुख्याधापक, ग्रामस्थ तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: ‘Shravan Bal, Sanjay Gandhi Yojana at your door’