जलसंधारणाकरिता वाठोडावासीयांचे श्रमदान
By Admin | Updated: May 23, 2016 00:19 IST2016-05-23T00:19:56+5:302016-05-23T00:19:56+5:30
तालुक्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. भूजल पातळी कमालीची खालावल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.

जलसंधारणाकरिता वाठोडावासीयांचे श्रमदान
वरूड : तालुक्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. भूजल पातळी कमालीची खालावल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. याकरिता पाणी फाउंडेशनच्यावतीने 'वॉटर कप' स्पर्धेकरिता विदर्भातून एकमेव वरूड तालुक्याची निवड करण्यात आली. यामध्ये ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. अभिनेता आमिर खान यांनी १५ दिवसांपूर्वी वाठोडा गावाला भेट देऊन श्रमदान केले. यामुळे ेनागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आता १०० नागरीक नियमित श्रमदान करून बंधाऱ्यांची निर्मिती करीत आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याकरिता २ लाख ५२ हजार रुपयांची लोकवर्गणी ग्रामपंचायतींकडे गोळा झाली. यातून जलसंधारणाची कामे ेकरण्यात येत आहेत. तालुक्यातील भूजल पातळी वाढविण्याकरिता श्रमदान आणि लोकसहभागातून जलसंधारणाच्या योजना राबविण्यात येत आहेत.
पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यजित भटकळ यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता विदर्भातून वरूड तालुक्याची निवड केली. यामध्ये ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. नियमित १०० लोकांचा सहभाग याला मिळत आहे. गावातील नागरिकांचा उत्साह पाहून अभिनेता आमिर खान, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी श्रमदान करून लोकांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. श्रमदानाकरिता ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी, विदर्भ पटवारी संघ, महिला बचतगट, बजरंग दल, शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी, समाजप्रबोधन मंच, जायन्टस ग्रुप, इंडियन मेडिकल असोसिएशन, पत्रकार संघ युवा जागर, युवक मंडळ, भजनी मंडळ, व्हॉलीबॉल संघ आदी सेवाभावी संघटना पुढे सरसावल्या असून गावांमध्ये जाऊन श्रमदान करीत आहेत. आर्थिक पाठबळ असावे म्हणून जलसंधारणाच्या कामाकरिता वाठोडा ग्रामस्थांनी २ लाख रुपये लोकवर्गणी जमा केली आहे. जसंधारणाची कामे पूर्ण करून गावातील भूजल पातळी वाढविण्याकरिता अभिनेता आमिरखान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन श्रमदान निरंतर सुरू ठेवले आहे. नागरिकांंचा उत्साह पाहता नियमित १०० महिला-पुरुष श्रमदानाला जात असतात.
गाडगेबाबा मंडळाने बांधले जनावरांसाठी पाणी टाके
येथील गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे यांनी माहुली फाटयानजीक असलेल्या हॉटेल पारिजातजवळ मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय व्हावी, या दृष्टिकोनातून येथे मोठे टाके मागील अनेक वर्षांपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी जंगलात गाई-म्हशी व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. हे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी येथे शहानूर योजनेचे नळ कनेक्शन घऊन तो नळ टाक्यात सोडण्यात आले. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या जनावरांची तहान या पाण्यामुळे भागविली जाते. त्यामुळे यातून बरीच सोय झाली आहे.