पक्षबांधणी करून विरोधकांना जागा दाखवा

By Admin | Updated: July 28, 2016 00:14 IST2016-07-28T00:14:50+5:302016-07-28T00:14:50+5:30

मोर्शी, वरूड मतदारसंघात स्वगृहातील उमदेवाराला निवडून न देता बाहेरच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागते, ही शोकांतिका आहे.

Show the seats to the opponents by sidebinding | पक्षबांधणी करून विरोधकांना जागा दाखवा

पक्षबांधणी करून विरोधकांना जागा दाखवा

सुबोध मोहिते : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चाचपणी 
वरूड : मोर्शी, वरूड मतदारसंघात स्वगृहातील उमदेवाराला निवडून न देता बाहेरच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागते, ही शोकांतिका आहे. काँग्रेसची पक्षबांधणी करून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तर बुथ, वार्ड, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस बळकट करून नवचैतन्य निर्माण करावे, असे आवाहन पक्ष निरीक्षक, माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते यांनी स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात काँग्रेस कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला पक्ष निरीक्षक माजी केंद्रीय अवजडमंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री शेखर सावरबांधे , माजी आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेश महासचिव नरेशचंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती गिरीष कराळे, तालुकाध्यक्ष तसेच बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाणे, शहर अध्यक्ष प्रमोद टाकरखेडे, शेंदूरजनाघाटचे शहर अध्यक्ष अनिल आंडे, वधार् लोकसभा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष जि.प.सदस्य विक्रम ठाकरे, खरेदी विक्री संघोच अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी अध्यक्ष बाबाराव बहुरुपी, जिल्हा कॉग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रदिप कांबळे , माजी जिप.सदस्या जयश्री गोहाड ,छोटू पाटील, नरेंद्र चोरे, अल्पसंख्याक सेलचे निसार अली ,बंटी काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
काही महिन्यांवर नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदांची निवडणूक आली आहे. निवडणूक परीक्षक म्हणून माजी केंद्रीय अवजडमंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री शेखर सावरबांधे यांची अमरावती जिल्हा आणि मोर्शी मतदारसंघाकरिता नियुक्ती झाल्याने तालुक्यातील पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी बुथ, गाव, वार्ड, मोहल्ला तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करुन पक्षबांधणीकरीता सदस्य नोंदणी, उमेदवारांची चाचपणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विरोधी भूमिका पार पाडतांना शेतकऱ्यांसह सर्वसामान्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करून न्याय मिळवून देण्याकरीता सर्व कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे तर कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात १५ वर्षांपासून आपण मागे जात आहो याबाबत विचार करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले.

शेंदूरजनाघाटचे भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल !
शेंदूरजनाघाट येथील भाजपाचे कार्यकर्ते उल्हास लेकूरवाळे , अशोक अढाऊ आदींनी पक्ष निरीक्षक सुबोध मोहिते आणि शेखर सावरबांधे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Web Title: Show the seats to the opponents by sidebinding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.