अंजनगावच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:01:31+5:30
उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी १० जून रोजी दुपारच्या सुमारास शहरात धडकल्या. पान अटाई, शनिवारा, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, आलम चौक, पाचपावली या भागात जवळपास तीन तास पायी फिरून पाहणी केली. फिजिकल डिस्टंसिंगचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर प्रकार आढळून आल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

अंजनगावच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी बुधवारी अंजनगाव शहरातील मुख्य बाजारपेठेची आकस्मिक पाहणी केली. यादरम्यान उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारांना दंडित केले. तीन तासांच्या पाहणीनंतर मुख्याधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याचे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी णार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी १० जून रोजी दुपारच्या सुमारास शहरात धडकल्या. पान अटाई, शनिवारा, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, आलम चौक, पाचपावली या भागात जवळपास तीन तास पायी फिरून पाहणी केली. फिजिकल डिस्टंसिंगचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर प्रकार आढळून आल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. पान अटाईवरील एक दुकान सील करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यास सांगितले. अनेकांच्या दुकानात फिजिकल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते तसेच काही दुकानदार मास्क न लावता आढळून आले. तर काही दुकानात सॅनिटायझर नव्हते. पाचपावलीजवळ परवानगी नसतानासुद्धा भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लागल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहरात मास्क न लावता फिरणाºया नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेचा धसका घेत अनेक दुकाने बंद करण्यात आली. शहरात फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसल्याबाबत अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्यासमवेत तहसीलदार विश्वनाथ घुगे, नायब तहसीलदार सोळंके, मंडल अधिकारी राजेश मिरगे, तलाठी राजकुमार गवई, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ तसेच नगरपालिकेचे कर्मचाºयांचा ताफा होता.
नोटीस बजावण्याचे आदेश
अंजनगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांचे काम समाधानकारक नसल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी तहसीलदार विश्वनाथ घुगे यांना दिले.