उन्हाळ्याच्या प्रारंभीच लघु प्रकल्प तहानले
By Admin | Updated: March 11, 2017 00:11 IST2017-03-11T00:11:07+5:302017-03-11T00:11:07+5:30
यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.

उन्हाळ्याच्या प्रारंभीच लघु प्रकल्प तहानले
२९ टक्के जलसाठा : मुख्य, मध्यम प्रकल्पांचा मात्र दिलासा
अमरावती : यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास दोन महिन्यांत हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्यात एकमेव उर्ध्व वर्धा व चार मध्यम प्रकल्पांत सध्या पुरेसा जलसाठा आहे.
जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मुख्य प्रकल्पात आज तारखेत ६५२ दलघमी साठा आहे. ही ४२.९७ टक्केवारी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये शहानूर प्रकल्पात ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत २९.७८ दलघमी साठा आहे. ही ६४.६८ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात ४१.२५ दलघमीच्या तुलनेत २८.८२ दलघम म्हणजेच ६९.८७, पूर्णा प्रकल्पात ३५.३७ दलघमीच्या तुलनेत १५.३८ दलघमीच्या तुलनेत २६.५७ दलघमी जलसाठा आहे. ही ६८.८३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात एकूण १२१ मध्यम व लघु प्रकल्प आहेत. यापैकी ५० प्रकल्पांची नोंद जलसंपदा विभागाद्वारा घेतली जाते. यामध्ये ४६ लघु प्रकल्पात ९७.९८ दलघमी पूर्ण संचय पातळीच्या तुलनेत आजच्या स्थितीत २८.४२ दलघमी जलसाठा आहे. ही २९.०१ टक्केवारी आहे.
लघुप्रकल्पामध्ये अमरावती तालुक्यात मालेगाव ४२.५० टक्के, घाटखेड ३०.३८, केकतपूर ५१.९३, खनिजापूर २४.९३, गोंडवाघोली २२, सावरपाणी २४.५९, साखळी २१.३७, मालखेड ३१.३६, बसलापूर ४१.५५, सरस्वती ४७.५६, टाकळी २५.६२, सूर्यगंगा ३२.१६, जमालपूर २३.४७, खारी २७.३९, साद्राबाडी २९.५५, मांडवा २४.८२, बोबडो ३०.६३, लवादा २४.१४, बेरडा २१.६५, ज्युटपाणी २१.५५, मोगर्दा २५.४७, पुसली ३३.३९, नादुरी ४०.५७ व चारगढ प्रकल्पात सद्यस्थितीत ४९.७५ टक्के जलसाठा आहे. (प्रतिनिधी)
या प्रकल्पात अत्यल्प साठा
सद्यस्थितीत दस्तापूर ४.३९ टक्के, गोंडविहीर १५.२४, टोंगलफोडी १९.८३, पिंपळगाव १६.६७, दाभेरी ८.३३, पंढरी ६.९०, जामगाव १५.६३, गावलानडोह १७.४२, सावलीखेडा १७.८०, रभांग १८.९८, सालई २०, गंभेरी १४.७९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा आहे.
प्रकल्पांचा तुलनात्मक जलसाठा
लघुप्रकल्पात सद्यस्थितीत २९ टक्के जलसाठा आहे. याच दिनांकात २०१२ मध्ये २२.०९ टक्के, २०१३ मध्ये २५.४८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.