थोडक्यातील बातम्या पान ४ करिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:25+5:302021-07-18T04:10:25+5:30
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागालगतच्या प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाचे मात्र तेथील साफसफाईकडे दुर्लक्ष आहे. ............................................ सांडण्याच्या ...

थोडक्यातील बातम्या पान ४ करिता
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागालगतच्या प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाचे मात्र तेथील साफसफाईकडे दुर्लक्ष आहे.
............................................
सांडण्याच्या नाल्या तांबल्या
अमरावती : मिनीमंत्रालयातून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत गाळ साचला आहे. या गाळात गवत वाढत असल्याने पाण्याचा प्रवाहसुध्दा रोखला जात आहे.
...........................................................................
बदली प्रक्रियेच्या तयारीला वेग
अमरावती : जिल्हा परिषदेत सध्या कर्मचारी बदल्यांसाठी प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. यासाठी शनिवार या सुटीच्या दिवशीही काही विभागात अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर हजर होते.
............................................
दोन दिवसांपासून पावसाची उघडीप
अमरावती : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघाड दिली आहे. त्यामुळे शेतीची खोळंबलेली कामे मार्गी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
.....................................
आगग्रस्त ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू
अमरावती : जिल्हा परिषदेतील अतिरिक्त सीईओंच्या दालनात असलेल्या मार्गावर इन्व्हर्टर बॅटरी फुटल्याने लागल्या आगीत विजेचे साहित्य जळाले होते. या साहित्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सुरू होते.