दुकानदार भररस्त्यात थाटतात दुकाने

By Admin | Updated: May 28, 2016 00:13 IST2016-05-28T00:13:14+5:302016-05-28T00:13:14+5:30

जुळ्या शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सदर बाजाराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

Shops Shop | दुकानदार भररस्त्यात थाटतात दुकाने

दुकानदार भररस्त्यात थाटतात दुकाने

पालिकेचे दुर्लक्ष : सदर बाजार अतिक्रमणाच्या विळख्यात
सुनील देशपांडे अचलपूर
जुळ्या शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सदर बाजाराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यात दुकानदार रस्त्यावर दुकाने थाटून बसल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागतात. इतकेच नव्हे, तर पादचाऱ्यांचा जीवदेखील टांगणीला लागला आहे. येथील काही दुकानदारांचे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याची परिसरात चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते विदर्भ मिलपर्यंतचा राज्य महामार्ग दुभाजक सौंदर्यीकरणासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटाओ मोहीम मागील दोन दिवसांपासून राबवून मोकळा केला आहे. याच अतिक्रमणामुळे गेल्या एक महिन्यापूर्वी १५ दिवसांत चार जणांना अपघातात जीव गमवावा लागला. सा.बां. विभागाने अतिक्रमण काढले. पण अजूनही अचलपूर नगर परिषदेला जाग आलेली नाही.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बाजारपेठेत चांगलीच गर्दी असते. परतवाडा येथील सदर बाजार हा बाजारपेठेतील मुख्य भाग आहेत. येथे सर्वच वस्तूंची व कापडाची विक्रीची दुकाने आहे. काही दुकानदार आपली दुकाने मांडतात. त्यामुळे अगोदरच अतिक्रमणाच्या व हातगाड्यांच्या विळख्यात सापडलेला रस्ता अधिक अरुंद होतो. बहुतांश दुकानांसमोर पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्याचे वोन उभे करण्याची वेळ ग्राहकांवर येत. काही दुकानदार विक्रीसाठी असलेले साहित्य रस्त्यावर तर मांडतातच; सोबत दुकानासमोर हातगाडी लावून माल सजवतात.एक दुकानदार दुकानातील माल एकावर एक रचून रस्त्यात मांडतो. येथून जाणाऱ्या वाहन धारकाला अक्षरश: कसरत करत येथून वाहन न्यावे लागते. एखाद्या वाहनधारकांचा या मालाला धक्का लागल्यास तो खाली पडतो. तेव्हा या दुकानातील दोन भाऊ व काम करणारे कर्मचारी या वाहनधारकाला मारहाण करतात. वरून पोलिसात देण्याची धमकीही देतात. पोलिसांशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने रस्त्यावर माल असल्यावरही ते कारवाई करीत नाहीत, असे जनतेचे म्हणणे आहे.

पालकमंत्र्यांचा आदेश गेला कुठे ?
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अचलपूर पतरवाड्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी अनेकवेळा नगरपालिका सा.बां. विभाग, महसूल विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकाही घेतल्या. अनेकदा तंबी दिली, मात्र त्याचा काहीही परिणाम नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. जे अधिकारी पालकमंत्र्याच्या आदेशाला जुमानत नाही ते सर्वसामान्याची काय समस्या ऐकत असतील, असा सवाल जनता करीत आहे.
मेळघाट बाजारपेठ
मेळघाटसह अचलपूर तालुक्याची परतवाडा हीच बाजारपेठ असून सदर बाजार हा त्याचा मुख्य भाग असल्याने तो अतिक्रमणमुक्त असावा, पण काही दुकानदार रस्त्यात माल मांडत असून नगर पालिकेचे अधिकारी त्याकडेदुर्लक्ष करीत असल्याने खरेदीसाठी येणारा ग्राहक त्रस्त झाला आहे. याकडे नगरपालिकेचे व पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे, असे मत माधुरी शिंगणे, वर्षा हिरुळकर, विवेक मालगे, सुधीर गुल्हाने, महेश शेरेकर, संदीप देंडव, आकाश तंतरपाळेंसह आदींनी व्यक्त केले आहे.

Web Title: Shops Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.