दुकान फोडणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:02+5:302021-03-21T04:13:02+5:30
फोटो पी २० येवदा अंजनगाव सुर्जी : येथील वसीमोद्दीन जियाउद्दीन यांच्या आर्मीचर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील २० हजार ...

दुकान फोडणारी टोळी जेरबंद
फोटो पी २० येवदा
अंजनगाव सुर्जी : येथील वसीमोद्दीन जियाउद्दीन यांच्या आर्मीचर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील २० हजार ५०० रुपयांचा माल अज्ञात चोराने चोरुन नेला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अंजनगाव सुर्जी हद्दीत १८ मार्च रोजी पेटोलिंग करत असताना त्यांचा चोरांबाबत माहिती मिळाली. येथील आर्मीचर दुकान हे राकेश साहू (रा. अंजनगाव सुर्जी) याने त्याचे साथीदारासह फोडून तेथून चोरी केली. ते चोरीचे साहित्य तो विक्री करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन अजिजपुरा येथे सापळा रचुन आरोपी राकेश गणेश साहु (२३, रा. अंजनगाव सुर्जी) यास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तो गुन्हा १४ मार्च रोजी सादिक खान साबीर खान (२३), आशुतोष शिवरतन धारस्कर (२१), बजरंग गोकुलदास पळस्कर (२८ सर्व रा. अजिजपुरा, अंजनगाव सुर्जी) व एका ३५ वर्षीय आरोपींसह केल्याची कबुली राकेश साहू याने दिली. चारही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल बॅटऱ्या व इतर साहित्य तसेच वापरलेले वाहन क्र.एम.एच.३१ एपी ७८८६ असा एकुण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. आरोपींनी अंजनगाव सुर्जी हद्दीत भंडारज येथे शेतातील केबल व लिंबू चाेरी केल्याचे कबुली दिली. त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.