शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:16 IST

शासकीय आश्रमशाळांमध्ये ६६४ जणांची नियुक्ती केली, पण आता आदिवासी विकास मंत्र्यांनी विधिमंडळ सभागृह आणि उमेदवारांची फसवणूक केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 -गणेश वासनिक, अमरावती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील तासिका तत्त्वावरील शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विषय विरोधी पक्षाकडून १५ जुलै रोजी सभागृहात आल्यानंतर ६६४ तासिका शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित केल्याचा दावा आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी सभागृहात केला. परंतु, प्रत्यक्षात तासिका शिक्षकांच्या सेवा नियमित केल्या नसून, त्यांना तासिका व रोजंदारीवरच नियुक्त्या दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांनी विधिमंडळ सभागृह आणि उमेदवारांची फसवणूक केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गत १३ ते १४ दिवसांपासून नाशिक आयुक्तालयासमोर आश्रमशाळांतील बाह्यस्त्रोताद्वारे भरती प्रक्रिया रद्द करा व तासिका शिक्षक, रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. 

२ हजार ६०० शिक्षकांना पाठवले घरी

‘ट्रायबल’ने शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये १ हजार ७९१ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरती करण्याचा शासन निर्णय २१ मे २०२५ रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे ४४९ आश्रमशाळांतील तासिका व रोजंदारीवरील सुमारे २ हजार ६०० शिक्षकांना घरी पाठवले आहे. 

शाळा चालू होऊन महिना झाला आहे. अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षक मिळाले नाही. आदिवासी विकास विभागाने नियुक्त्या केलेल्या नाही, हे वास्तव आहे. आता मात्र ज्यांच्या सेवा १० वर्षे झाल्यात अशा ६६४ तासिका शिक्षक, रोजंदारी कर्मचारी यांना आदिवासी मंत्र्यांनी सभागृहात नियमित केल्याचे सांगून शुद्ध फसवणूक केलीच; पण तासिका शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी पात्रताधारक नाहीत. त्यांची बाजू घेऊ नका, असेही मंत्र्यांनी सभागृहात आवाहन केले. परंतु बहुतांश उमेदवार उच्च शिक्षित असून पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत.

शासनाचे ५० कोटींचे नुकसान

तासिका व रोजंदारीवर असलेल्या २ हजार ६०० शिक्षकांच्या वेतनावर वार्षिक अंदाजे ३५ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. बाह्यस्त्रोताद्वारे १७९१ शिक्षक भरतीसाठी ८४ कोटी ७४ लाख ५५ हजार रुपयांच्या कंत्राटाला मंजुरी दिलेली आहे. यात ५० कोटी रुपये कोणाच्या घशात घालणार आहे. बाह्यस्त्रोताची भरती ही प्रक्रियेतच अडकली आहे.

कोर्टात अवमान याचिकांचा पाऊस

मुंबई उच्च न्यायालयाने शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहामध्ये दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या रोजंदारी आणि तासिका तत्त्वावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्याचे आदेश १४ ऑक्टोबर २०२४ व १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दिले होते. 

या कार्यवाहीसाठी १८० दिवसाची मुदतही दिली. परंतु, विभागाने कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून कोणतीच कार्यवाही केली नाही. परिणामतः शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शासन विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्या आहेत. याच तासिका शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्यांना पुन्हा तात्पुरत्या नियुक्त्या दिलेल्या आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणAmravatiअमरावती