धक्कादायक, चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण ५६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:14+5:302021-02-09T04:15:14+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यात गतिमान झालेली असतांंना कोरोना संसर्गही तेवढ्याच झपाट्याने वाढू लागला ...

Shocking, 56 percent positive in tests | धक्कादायक, चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण ५६ टक्के

धक्कादायक, चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण ५६ टक्के

गजानन मोहोड

अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यात गतिमान झालेली असतांंना कोरोना संसर्गही तेवढ्याच झपाट्याने वाढू लागला आहे. सोमवारी चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण धक्कादायक असे ५६.३५ टक्के असल्याचे नोंदविल्या गेले. यात ४१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल २३५ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे १० महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदा नोंद झाले.

जानेवारी महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यातील कोरोनाचे संसर्गात वाढ झालेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्येची रोज उच्चांकी नोंद होत आहे. याशिवाय चाचण्यांमधील पॉझिटिव्हीटीही दिवसेनदीवस वाढतच आहे. १ फेब्रुवारीपासून अहवालात १६ ते २२ टक्कयांपर्यत पॉझिटीव्हची नोंद झाललीे असताना सोमवारी कोरोनाची रुग्णसंख्या व चाचण्यांंत पॉझिटिव्हचे प्रमाण वेगाने वाढले. त्यामुळे ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवातही नव्हे, अशी भीती निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या २३,२९३ वर पोहोचली असल्याने जिल्ह्याच्या चितेंत भर पडली आहे.

राज्यात कोरोनाचे संसर्गात कमी होत असताना अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राच्या आरोग्य पथकाने रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधून काही टिप्स दिल्या. प्रत्यक्षात सलग १० महिन्यांपासून आरोग्य यंत्रणाही कोरोनाविषयक कामकाजात व्यस्त असल्याने व कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने थोडी ढिलाई आल्याचे वास्तव आहे. दरम्यान कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा उपाययोजना केल्या जात आहे.

बॉक्स

असा वाढला कोरोना संसर्ग

दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह टक्केवारी

१ फेब्रुवारी ४०५ ९२ २२.७१

२ फेब्रुवारी ७१७ ११८ १६.४५

३ फेब्रुवारी १०७१ १७९ १६.७१

४ फेब्रुवारी ९१० १५८ १७.३६

५ फेब्रुवारी ११६१ २३३ २०.०६

६ फेब्रुवारी ९५७ १९९ २०.७९

७ फेब्रुवारी ९६२ १९२ १९.९५

८ फेब्रुवारी ४१७ २३५ ५६.३५

बॉक्स

सोमवारी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासात उपचारदरम्यान एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यची संख्या ४२४ वर पोहोचली आहे तर उपचारादरम्यान बरे वाटल्याने सोमवारी ८९ रुग्णांना संक्रमनमुुक्त करण्यात आले आहे. सद्यस्थितीत २२,२६२ जण कोरोनामुक्त झालेले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचे तुलनेत हे प्रमाण ९५.५७ टक्के असल्याने जिल्ह्यास एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

कोट

चाचण्यांमध्ये पॉझिटीव्हचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी या काळात संतर्क राहणे महत्वाचे आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्ट पाळणे व अंगावर दुखणे न काढता चाचणी करणे महत्वाचे आहे.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Shocking, 56 percent positive in tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.