शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला धक्का; सुलभा खोडके बांधणार 'घड्याळ'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:10 IST

Amaravati : रविवारी अजित पवारांचा सत्कार; आमदारांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस की राष्ट्रवादी? कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म लावून उमेदवारी अर्ज भरायचा, या द्विधा मनस्थितीत असलेल्या सुलभा खोडके यांनी अमरावती मतदारसंघातून काँग्रेसच्या 'पंजा'वर निवडणूक लढवली अन् विजयी झाल्या. त्यावेळी भाजपचे डॉ. सुनील देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. तथापि आमदार काँग्रेसच्या असताना सुलभाताई? या पाच वर्षे कायम राष्ट्रवादीतच रमल्या, हे विशेष. यंदा मात्र त्या पुन्हा हातात घड्याळ बांधणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार गेले, तर काही दिवसांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली नि महायुतीत सामील झाले. तसेही सत्ता अन् राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण फार जुने आहे. महायुतीत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले.

तेव्हापासून काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत अधिक सलगी वाढली. अमरावती मतदारसंघाच्या विविध विकासकामांसाठी निधी असो वा शासन स्तरावर प्रलंबित समस्या असो त्या प्राध्यान्याने सोडविण्यासाठी सुलभाताईंनी दादांचीच मदत घेतली. मध्यंतरी राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांवर 'क्रॉस व्होटिंग' केल्याचा ठपका ठेवण्यात आला. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ज्या पाच आमदारांनी दगाफटका केला त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभाताईंचेही नाव होते.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात त्या कुठेच दिसल्या नाही. एकंदरीत आमदार खोडके यांची वाटचाल अजित पवार गटाकडे आहे. महायुतीतून शिंदेसेनेनेही अमरावतीवर दावा केला आहे. किंबहुना अजित पवार पक्षाला अमरावतीची जागा सुटल्यास भाजप, शिंदेसेना कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांचा नजरा लागणार आहे. 

भाजप अमरावती सोडणार का? भाजप-सेना युतीपासून अमरावती मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. विधानसभा, विधान परिषद निवडणुकीत भाजपला यापूर्वी यश मिळाले आहे. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघ हा मित्र पक्षाच्या वाट्याला जाईल, असे संकेत आहेत. परंतु काहीही झाले तरी अमरावतीत 'कमळ' हवे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे मागणी आहे. बघू या वरिष्ठ अमरावतीबाबत काय निर्णय घेतात!

टॅग्स :congressकाँग्रेसAmravatiअमरावतीPoliticsराजकारण