वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:41 PM2018-03-29T21:41:01+5:302018-03-29T21:41:01+5:30

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली. स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Shobhayatram for Mahavir Jayanti | वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

Next

ऑनलाईन लोकमत
वरूड : भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली.
स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टने काढलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा मेन रोड परिसर, महात्मा गांधी चौैक, महात्मा फुले चौैक, पोलीस स्टेशन रोड, सावता चौैक, कुबडे चौैक या मार्गाने काढण्यात आली. यामध्ये अध्यक्ष प्रकाश आगरकर, उपाध्यक्ष नितीन मोरस्कर, संजय विटाळकर, पद्मकुमार मानेकर, चंद्रकांत थेरे, देशबंधुदास महात्मे, पांडुरंग महात्मे, जयकुमार गव्हाणे, देशभूषण महात्मे, राजेश जैैन, मनीष विटाळकर, देवाजी महात्मे, हुकुम मानेकर, प्रशांत मानेकर राजाभाऊ मांडवगडे, नितीन मोरस्कर, अतुल मानेकर, यशपाल जैन, अनूप जैन, प्रवीण जैन, राहुल महात्मे, बंटी महात्मे यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले. वरूड येथून श्रीपार्श्वतीर्थ नागठाणा येथे गेलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघातर्फे शांताबाई चोपडे सभागृहात यानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये अनेकांनी सहभाग दिला.

Web Title: Shobhayatram for Mahavir Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.