शिवसेनेत आता ‘सफाई’ अभियान
By Admin | Updated: November 16, 2014 22:42 IST2014-11-16T22:42:55+5:302014-11-16T22:42:55+5:30
विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ‘टार्गेट’ केले आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी पक्षात सफाई अभियान चालविले आहे.

शिवसेनेत आता ‘सफाई’ अभियान
पराभूत उमेदवारांची बैठक : नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
अमरावती : विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ‘टार्गेट’ केले आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी पक्षात सफाई अभियान चालविले आहे. महानगर प्रमुख दिगंबर डहाके, धामणगाव, तिवसा विधानसभा उपजिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा. आनंदराव अडसूळ यांनी हे निर्णय घेतले असून पुढे बऱ्याच फेरबदलांचे संकेत आहेत.
सोमेश्वर पुसतकरांची सेनेत ‘एन्ट्री’?
भव्यदिव्य कार्यक्रम असो की पक्ष संघटन अशा विविध स्तरावरील मॅनेजमेंटचे कौशल्य असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सोमश्वर पुसदकर यांची सेनेत पुन्हा ‘एन्ट्री’ होण्याची दाट शक्यता आहे. पुसतकर हे जिल्हाप्रमुख असताना त्यांनी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना बांधणीसाठी प्रयत्न केले आहेत. अलिकडे पुसतकर आणि खा. अडसूळ यांच्यात सुसंवाद असल्यामुळे पुसतकरांना सेनेत मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत.