स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार शिवस्वराज्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:32+5:302021-06-02T04:11:32+5:30
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ या राज्याभिषेक दिनाप्रीत्यर्थ ६ जून हा दिवस सर्व ग्रामपंचायती, ...

स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार शिवस्वराज्य दिन
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ या राज्याभिषेक दिनाप्रीत्यर्थ ६ जून हा दिवस सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिवस साजरा केला जाणार आहे.
जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादनासोबतच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत.