मोर्शीत दानवेंविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST2020-12-14T04:28:57+5:302020-12-14T04:28:57+5:30
पान २ मोर्शी : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे ...

मोर्शीत दानवेंविरोधात शिवसेनेचे आंदोलन
पान २
मोर्शी : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबर रोजी शिवसेना मोर्शी तालुका व शहर तसेच महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालयावर येऊन धडकले. दानवे यांना पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी करून आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र गुल्हाने, नगरसेविका क्रांती चौधरी, पंचायत समिती सदस्य भाऊराव छापाने, शहरप्रमुख घनशाम सिंगरवाडे, सुरेशचंद्र विटाळकर, रवींद्र बुरंगे, ओंकार काळे, मुन्ना रायचूरा, शेषराव खोडस्कर, ओंकार जोल्हे, सपना खन्ना, शंकर मोरे, अमर नागले, आकाश छापाने, अंकुश राऊत, अभिजित साउथ, पुष्कर लेकुरवाळे सह शेकडो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.