शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST2021-02-07T04:12:10+5:302021-02-07T04:12:10+5:30
शिवसैनिक टांग्याने पोहोचले एसडीओ कार्यालयावर चांदूर रेल्वे: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा निषेध म्हणून शिवसेनेने उपविभागीय ...

शिवसेनेचे आंदोलन
शिवसैनिक टांग्याने पोहोचले एसडीओ कार्यालयावर
चांदूर रेल्वे: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा निषेध म्हणून शिवसेनेने उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. शिवसैनिक टांग्याने पोहोचले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी केले. उपजिल्हाप्रमुख प्रमोद कठाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र निंबर्ते, स्वप्निल मानकर, नीलेश तिवारी, कौस्तुभ खेरडे, गजानन बोबडे, राजाभाऊ मेटे, त्रिलोकचंद मानकानी, बाबाराव खोडके व तालुकावासी उपस्थित होते.
----------------
फोटो पी ०६ दर्यापूर
इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून दर्यापुरात निषेध
दर्यापूर : स्थानिक गांधी चौकात शिवसैनिकांनी एकत्र येऊन पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्र सरकारविरुद्ध निषेध व्यक्त केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन वाकोडे, तालुकाप्रमुख गोपाल अरबट, शहरप्रमुख रवींद्र गणोरकर, बबनराव विल्हेकर, योगेश बुंदे, नीलेश पारडे, नीलेश मोहोड, राजू मानकर, गोपाल काठोडे, गौरव सगणे, बाल्या तळोकार, नागेश कंबे, सागर गिऱ्हे, सचिन कोरडे व शिवसैनिक उपस्थित होते.
------------
परतवाड्यात शिवसेनेचा बैलबंडी मोर्चा
परतवाडा : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात अचलपूर शिवसेनेच्यावतीने ५ फेब्रुवारीला बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख बंडू घोम, उपजिल्हाप्रमुख ओमप्रकाश दीक्षित, नरेश तायडे, गोवर्धन मेहरे, नरेंद्र पडोळे, अनिल तायडे, माणिक देशपांडे, आशिष सहारे, कृष्णा बोंडे, अंकित देशमुख, सुबोध बोंडे उपस्थित होते.
-----------------------
फोटो पी ०५ तिवसा
शिवसेनेचे तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन
तिवसा : पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करण्यासाठी शिवसेनेने तिवसा तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार वैभव फरतारे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, दत्ता माळादे, प्रकाश पडोळे, किशोर सातपुते, अजय आमले उपस्थित होते.