केंद्र सरकार विरोधात शिवसेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:24+5:302020-12-13T04:29:24+5:30
आंदोलन : इंधन दरवाढीसह दानवेंच्या वक्तव्याचा निषेध अमरावती : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब ...

केंद्र सरकार विरोधात शिवसेना रस्त्यावर
आंदोलन : इंधन दरवाढीसह दानवेंच्या वक्तव्याचा निषेध
अमरावती : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी महानगर शिवसेनेच्यावतीने येथील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पोस्टरला चपलांनी बदडून संप्ताप व्यक्त केला. काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. दरवाढीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून, दरवाढ मागे घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याशिवाय सध्या दिल्ली येथे केंद्र सकरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी अन्यायकारक कायदे रद्द करावे, याकरिता शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या मुद्यावर शेतकरी विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी रोष व्यक्त करीत त्यांच्या पोस्टरला चपलांनी बदडून काढले. यावेळी आंदोलनात महानगरप्रमुख पराग गुडधे,
माजी आमदार श्रीकांत देशपांडे, धाने पाटील, जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर, सुधीर सूर्यवंशी, प्रशांत वानखेडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, नगरसेविका अर्चना धामणे, जयश्री कुऱ्हेकर प्रतिभा बोपशेट्टी, कांचन ठाकुर, भारत चौधरी, बाळा सावरकर, पंजाबराव तायवाडे, विकास शेळके, संजू शेटे, दिगंबर मानकर, गोपाल राणे, श्याम धाने, प्रकाश मारोटकर, वैभव मोहोकर,प्रविन अब्रुक नितीन हटवार पवन दळवी शिवराज चैधरी अंकुश सोलव अतुल सावरकर बंडु कथिलकर आदित्य ठाकरे, अक्षय चऱ्हाटे, विजय ठाकरे, मयूर गव्हाणे, ओम राणे, अनुराग वानखडे, शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.