शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दर्यापुरात साजरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:56+5:302021-01-23T04:12:56+5:30

अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हा ग्रंथालय सेनेच्यावतीने मूर्तिजापूर मार्गावरील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान ...

Shiv Sena chief Balasaheb Thackeray's birthday will be celebrated in Daryapur | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दर्यापुरात साजरी होणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दर्यापुरात साजरी होणार

अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हा ग्रंथालय सेनेच्यावतीने मूर्तिजापूर मार्गावरील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान येेथे साजरी केली जाणार आहे. याशिवाय वाचन प्रेरणा दिनदेखील शनिवारी सकाळी १० वाजता साजरा करण्यात येणार आहे. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाराव पाटील बरवट राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बळवंत वानखडे व इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती आयोजक महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेना राज्य उपप्रमुख निळकंठ टापरे यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------

अमरावतीत रंगणार हिंदी कमी संमेलन

अमरावती: नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सांयकाळी ६ वाजता राजकमल चौकातील स्थानिक टाऊन हॉल येथे ‘एक शाम राष्ट्रभक्ती के नाम’ या राष्ट्रीय एकात्मता हिंदी कवी संमेलनाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आनंदराव अडसूळ असतील. उद्‌घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या संमेलनात अनेक दिग्गज हास्य व्यंगसम्राटांची उपस्थिती लाभणार आहे.

---------------------------------------------------------------------------

बिच्छू टेकडी येथे दारू पकडली

अमरावती: फ्रेजरपुरा पोलिसांनी बिच्छुटेकडी येथील गजानननगरात कारवाई करून ६५० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई २० जानेवारी रोजी करण्यात आली. आरोपी करण दीपक खोडके (२२, रा. बिच्छुटेकडी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------------------

बेलपुरा येथे अवैध दारू जप्त

अमरावती: राजापेठ पोलिसांनी येथील बेलपुऱ्यात कारवाई करून २४९६ रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई १९ जानेवारी रोजी करण्यात आली. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी आरोपी अंकुश राजु गुडघे (२७) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------------------------------------------------

महिलेस शिवीगाळ करून मारहाण

अमरावती : एका महिलेस चार आरोपींनी क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना लालखडी येथे बुधवारी घडली. अहमद बेेग रशीद बेग (५०), बबलू बेग रशीद बेग, मोहम्मद बेग रशीद बेग , अज्जू (सर्व रा. लालखडी) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Shiv Sena chief Balasaheb Thackeray's birthday will be celebrated in Daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.