लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सोमवारी तहसील कार्यालयावर धडकलेले शिवसेनेचे अमरावती तालुका पदाधिकारी व शिवसैनिकांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शिवसेनेने दिलेल्या निवेदनानुसार, यंदा मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी व अन्य पिकांचे अमरावती तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची मोका पाहणीसुद्धा झाली आहे. अशातच बºयाच शेतकऱ्यांनी पीक विमासुद्धा काढला आहे. परंतु, याचा लाभ अजून पर्यतही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तो त्वरित देण्यात यावा. शासनाने जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपये आर्थिक मदत तुटंपुजी असून, नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. पीक विम्याचे पैसे, कृषिपंपाचे वीज देयके माफ करावे आदी मागण्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, तालुकाप्रमुख आशिष धर्माळे, नाना नागमोते, कैलास महल्ले, दिलीप ठाकरे, पंकज वाकोडे, अमोल तसरे, राजू घटी, नितीन नवघरे, अक्षय चºहाटे, अरुण भालेराव, अविनाश वानखडे, मनोज सोनार, दिलीप जगनाडे, पंकज ठाकरे, पद्माकर धोटे, सचिन निचित, दिलीप डांगे, भारत लकडे, किशोर राऊत, गजानन घुले, सुरेश ढोकणे, नीलेश माहोरे, सुनील कदम, नरेंद्र भोंडे, राजू जुनघरे, दिनेश अवशीकर व शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी शिवसैनिकांची तहसील कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सोमवारी तहसील कार्यालयावर धडकलेले शिवसेनेचे अमरावती तालुका पदाधिकारी व शिवसैनिकांनी केली.
शेतकऱ्यांसाठी शिवसैनिकांची तहसील कार्यालयावर धडक
ठळक मुद्देसंपूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक : तहसीलदारांना निवेदन