शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 12:20 IST

कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

अमरावती : राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्थिर आहे. एकाच मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. यावरून सरकारची अवस्था स्पष्ट होत आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

काँग्रेसचे खासदार व नेते राहुल गांधी सध्या भारत दौऱ्यावर असून ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात पोहोचणार आहे. पदयात्रेच्या पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी अमरावती येथे आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी बंडखोर शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.

पटोले पुढे बोलताना म्हणाले, राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मशिद, मदरशात जावे लागले. यावरून भारत जोडो पदयात्रा यशस्वी झाल्याचे हे द्योतक आहे. भाजपचा आयटी सेल, मोदी मीडियाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आता सक्षम होत आहे. कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

या वेळी मंचावर माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकसभा, बडनेरा विधानसभा काँग्रेसकडे

लोकसभा, बडनेरा विधासभेच्या जागांवर काँग्रसेचे उमेदवार असतील, मनपा निवडणुकीसाठी शहराचे सर्वेक्षण करून तिकीट वाटप केले जाईल, असे पटोले म्हणाले.

पालकमंत्री की स्पायडरमॅन ?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहेत. ते 'स्पायडरमॅन'सारखे काम करणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस