शिदोडीला आता कोरोनाचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:01 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:01:08+5:30
६० ते ६५ वर्ष व वयोवृद्ध रुग्णांना सलाईन देण्यात येत आहे. अतिसार बरा झाला. मात्र, दोन दिवसांपासून येथील ४५ जणांचा ताप कमी होत नसल्याने गुरूवारी आरोग्य विभागाने मोबाईल व्हॅन येथे बोलावून या सर्वांची कोरोना चाचणी केली. दोन दिवसात अहवाल येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी दिली. ३० कर्मचाऱ्यांचे आरोग्य पथक येथे कार्यरत आहे.

शिदोडीला आता कोरोनाचा धोका !
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पाच दिवसांपासून अतिसाराच्या साथीने त्रस्त असलेल्या शिदोडी गावात पुन्हा ४५ जणांना अतिसाराची लागण झाली. तब्बल ३० ग्रामस्थ तापाने फणफणल्याने कोरोनाचे नवे संकट या गावाच्या डोक्यावर घोंगावत आहे. दरम्यान ताप असलेल्या सर्वांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले आहेत.
या गावात नाल्याच्या पाण्याचा स्त्रोत पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्यात गेल्याने सहा दिवसांपासून गावाला दूषित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे उलटी, अतिसाराने अर्धे गाव त्रस्त होते. गुरुवारी सकाळी अन्य ४५ ग्रामस्थांना पुन्हा अतिसाराची लागण झाली. गावातील पाणीपुरवठा बंद करून दोन्ही विहिरीची पूर्ण स्वच्छता करण्यात आली.
दरम्यान, ६० ते ६५ वर्ष व वयोवृद्ध रुग्णांना सलाईन देण्यात येत आहे. अतिसार बरा झाला. मात्र, दोन दिवसांपासून येथील ४५ जणांचा ताप कमी होत नसल्याने गुरूवारी आरोग्य विभागाने मोबाईल व्हॅन येथे बोलावून या सर्वांची कोरोना चाचणी केली. दोन दिवसात अहवाल येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी दिली. ३० कर्मचाऱ्यांचे आरोग्य पथक येथे कार्यरत आहे. चार जणांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. तर अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. क्षीरसागर म्हणाले. बिडीओ पंकज भोयर, प्रशासक प्रवीण राठोड, विस्तार अधिकारी मिलिंद ठुनुकले ग्रामसेवक राऊत आदी गावात ठाण मांडून आहेत.