लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरफोड्या करणाऱ्या ‘बुरखाधारी’ महिला चोराला तिच्या पतीसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी यश मिळविले. अमरावती येथील रहिवासी महिलेने नवºयाच्या साथीने केलेल्या २३ चोऱ्यांची कबुली आतापर्यंत दिली आहे. त्यां दोघांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस सूत्रांनुसार, सीमा ऊर्फ हेमा परवीन शेख नसीम (३५) व शेख नसीम शेख सलीम असे या चोर दाम्पत्याचे नाव आहे. ते अमरावती शहरातील हैदरपुरा येथे मद्रासीबाबा दर्ग्याजवळील सादीयानगरात राहतात. परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ४ डिसेंबर रोजी घरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एक-दोन नव्हे, तब्बल २३ चोऱ्यांची कबुली या दोघांनी दिली. त्यांना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक आशिष चौधरी, सहायक उपनिरीक्षक वासुदेव नागलकर, हेडकॉन्स्टेबल शेख शकूर, नायक पोलीस काँस्टेबल नितीन शेंडे, काँस्टेबल दिनेश कनोजिया, अमोल केंद्रे, सोनाली जवंजाळ, चालक अरविंद लोहकरे, अब्दुल सईद यांनी ही कारवाई केली.नोकरदारांच्या बंद घरांना हेरण्याची कामगिरी हेमा व शेख नसीम पार पाडत होते. त्यासाठी नैसर्गिक विधीसाठी सदर परिसरातून लोटा घेऊन ते फिरत असत. घर हेरल्यानंतर भरदिवसा घर फोडून ऐवज लंपास केला जात असे.येथे केली घरफोडीशेख नसीम व हेमा यांनी अंजनगाव सुर्जी, मोर्शी, शिरखेड, तळेगाव दशासर, तिवसा येथे प्रत्येकी एक, दर्यापुरात दोन, परतवाड्यात दोन, चांदूर बाजारात चार, वरूड शहरात पाच, तर दत्तापुरात पाच घरे फोडल्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे दिली. या सर्व घरफोड्या भरदिवसा झाल्या आहेत.१० लाखांचा मुद्देमाल जप्तसीमा व शेख नसीम यांच्याकडून १५० ग्रॅमचे ५ लाख ८२ हजारांचे दागिने, २७३.१३ ग्रॅमचे १३ हजारांचे दागिने, एमएच ०६ झेड ७७७७ क्रमांकाची तीन लाखांची चारचाकी, विना क्रमांकाची ८० हजारांची मोपेड, २० हजारांचे चार मोबाइल, २५०० रुपये रोख व घरफोडीसाठी वापरलेला पेचकच जप्त केला. हा मुद्देमाल ९ लाख ९७ हजार रुपयांचा आहे.
‘ती’ बुरखाधारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST
परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ४ डिसेंबर रोजी घरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एक-दोन नव्हे, तब्बल २३ चोऱ्यांची कबुली या दोघांनी दिली.
‘ती’ बुरखाधारी जेरबंद
ठळक मुद्दे२३ चोऱ्यांची कबुली : नवºयाच्या साथीने करीत होती घरफोड्या, दोघेही अटक