‘ती’ कुमारी माता अखेर गवसली
By Admin | Updated: July 25, 2016 00:07 IST2016-07-25T00:07:27+5:302016-07-25T00:07:27+5:30
अंजनगाव - दर्यापूर मार्गावरील विकास प्लाझा या इमारतीवर गोंडस बाळाला जन्म देऊन पळ काढणाऱ्या अल्पवयीन कुमारी मातेचा शोध घेण्यात स्थानिक पोलीस यशस्वी झाले आहेत

‘ती’ कुमारी माता अखेर गवसली
नवजात अर्भकाचा मृत्यू : अंजनगाव सुर्जी येथील घटना
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव - दर्यापूर मार्गावरील विकास प्लाझा या इमारतीवर गोंडस बाळाला जन्म देऊन पळ काढणाऱ्या अल्पवयीन कुमारी मातेचा शोध घेण्यात स्थानिक पोलीस यशस्वी झाले आहेत. या अल्पवयीन कुमारी मातेने प्रसूतीनंतर नवजात अर्भकाला संकुलामध्ये ठेवून पळ काढल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघड झाली होती. या व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर केबल दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या एका दुकानदाराला नवजात अर्भक दिसून आले होते. अन्य व्यापारी संकुल तसेच त्याच संकुलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमुळे पोलिसांना मुलीचा शोध घेणे शक्य झाले.
ही कुमारी माता अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी त्या कुमारिकेची प्रकृती ठिक नसल्याने रुग्णालयात जाण्याची बतावणी करुन ती घराबाहेर पडली. अंजनगाव शहरातील विकास प्लाझा या संकुलातील एका डॉक्टरकडे तपासणीसाठी आली. मात्र तपासणीआधीच तिला प्रसुतीकळा आल्याने कुणालाही न सांगता ती व्यापारी संकुलाच्या बंद असलेल्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली व स्वच्छतागृहाजवळ पोहचताच तिने एका स्त्री अर्भकाला जन्म दिला. बाळाला तिथेच उघड्यावर टाकून तिने पळ काढला. पोलिसांनी त्या मातेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तासाभरातच शोध लावला. पीएसआय चांभारे यांनी कारवाई केली