‘ती’ अजूनही पालकांना नकोशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:58+5:30
येथील रमेश सोलव (६८) व अन्य एक जण ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास लघुशंकेकरिता उठले असता, त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाचा माग काढला असता, घराच्या चॅनेल गेटनजीक चिमुकली त्यांच्या दृष्टीस पडली. ती खेळत खेळत अन्यत्र जाऊ नये, यासाठी तिच्या हाताला चिंधी बांधलेली होती तसेच जवळ चेंडू ठेवला होता.

‘ती’ अजूनही पालकांना नकोशी!
लोकमत न्यूज नेटवर्क
करजगाव : नजीकच्या बोदड येथे एका घराच्या ग्रिलला जखडून ठेवलेल्या नऊ ते दहा महिने वयाच्या गोंडस चिमुकलीचा पालक ३६ तास उलटल्यानंतरही पुढे आलेले नाहीत. समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल होत असताना या चिमुकलीच्या परिचयाचे कुणीही पुढे येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोदड येथे ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास सदर चिमुकली हात चिंधीने बांधलेल्या अवस्थेत आढळली. येथील रमेश सोलव (६८) व अन्य एक जण ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास लघुशंकेकरिता उठले असता, त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाचा माग काढला असता, घराच्या चॅनेल गेटनजीक चिमुकली त्यांच्या दृष्टीस पडली. ती खेळत खेळत अन्यत्र जाऊ नये, यासाठी तिच्या हाताला चिंधी बांधलेली होती तसेच जवळ चेंडू ठेवला होता. सोलव यांनी शेजाऱ्यांना जागे करीत याबाबत माहिती दिली. मात्र, त्या चिमुकलीस कुणीही ओळखत नव्हते.
अमरावतीच्या बेबी केअर होममध्ये रवाना
सदर चिमुकलीचे छायाचित्र ५ व ६ सप्टेंबर या दोन दिवसांत समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. तथापि, तिच्या पालकांचा शोध लागलेला नाही वा कुणी परिचित पुढे आलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी अमरावती येथे मिशनरीच्या बेबी केअर होममध्ये पाठविण्यात आले.