पित्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘तिने’ अर्पण केले ‘शील’!

By Admin | Updated: August 30, 2014 01:13 IST2014-08-30T01:13:25+5:302014-08-30T01:13:25+5:30

नरेंद्र जावरे अमरावती शेतात रखवालदारी करून उदरनिर्वाह करण्यासाठी दोघे ‘बापलेक’ स्वत:चे गाव सोडून सावळीत आले.

She 'offered' to save father's life 'Shil'! | पित्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘तिने’ अर्पण केले ‘शील’!

पित्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘तिने’ अर्पण केले ‘शील’!

नरेंद्र जावरे अमरावती शेतात रखवालदारी करून उदरनिर्वाह करण्यासाठी दोघे ‘बापलेक’ स्वत:चे गाव सोडून सावळीत आले. पित्याचा आधार ठरलेली ‘ती’ बरोबरीने कष्टत होती. पण, अवघ्या तीन महिन्यांत सावळी गावातून आयुष्यभर सलणाऱ्या वेदना वाट्याला येतील याची पुसटशी कल्पनाही या बाप-लेकीला नव्हती. खेडोपाडी रात्र लवकर होते. दिवसभर श्रम करून कष्टकरी क्षणात निद्रादेवीच्या अधीन होतात. गुरूवारी नेहमीप्रमाणे जेवण आटोपून ‘ती’ झोपी गेली.. रात्री १० वाजताच्या सुमारास दारावर थाप पडली. काही कळायच्या आत तोंड झाकलेले दोन नराधम हातात कोयता, कुऱ्हाडी घेऊन झोपडीत दाखल झाले.. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच पित्याला ते बेदम मारहाण करू लागतात. हतबल पिता रक्तबंबाळ होतो. प्रतिकार करणाऱ्या दुसऱ्या चौकीदारालाही नराधम बदडून काढतात.. युवतीला झोपडीतून फरफटत बाहेर काढतात. तिच्या शरीराशी लोंबाझोंबी करू लागतात. विरोध केल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतात..तिच्यापुढे धर्मसंकट उभे ठाकते! शील वाचविण्यासाठी पित्याचा जीव गमवावा लागणार, हे तिला कळून चुकते..शेवटी ‘स्त्री’ धर्माला मोडता घालून ती मुलीचे कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेते. नरपशुंच्या क्रौर्याची परिसीमा अमरावती : पित्याच्या रक्षणासाठी नरपिशांचापुढे सर्वस्व अर्पण करते. ते नरपिशाच तिला फरफटत पऱ्हाटीच्या शेतात नेतात अन् पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार करतात. पहाटे पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा फरफटत तिला झोपडीत आणतात अन् तेथेही त्यांचा क्रूर आणि किळसवाणा प्रकार सुरूच राहतो. एखाद्या चित्रपटात घडाव्यात तशा घटनांमागोमाग घडलेल्या या घटना अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. पोटच्या मुलीच्या अब्रूची लक्तरे उघड्या डोळ्यांनी पाहूनही काहीच करू न शकलेल्या तिच्या हतबल पित्याची अवस्था दारूण आहे. पीडित तरूणी नि:शब्द झालीय. शील देऊन निदान पित्याचे प्राण तरी वाचले, एवढेच काय ते समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसतेय. पण, गुरूवारच्या रात्रीने दिलेल्या वेदना अन् तिने अनुभवलेली क्रौर्याची परिसीमा ती कशी विसरणार? हा खरा प्रश्न आहे. अस्वच्छतेचा कहर अमरावती : बडनेरा नवी वस्ती स्थित आठवडी बाजारात साफसफाई व्यवस्थितरीत्या होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सर्वत्र अस्वच्छतेचा कहर असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: She 'offered' to save father's life 'Shil'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.