तिने इंग्रजी शिक्षणाच्या भीतीने केले होते पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:05 IST2017-04-03T00:05:00+5:302017-04-03T00:05:00+5:30

पहिली ते दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेल्या एका आदिवासी मुलीला आई-वडिलांनी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यास बाध्य केले.

She had fled from the fear of English education | तिने इंग्रजी शिक्षणाच्या भीतीने केले होते पलायन

तिने इंग्रजी शिक्षणाच्या भीतीने केले होते पलायन

आदिवासी वसतिगृहातील मुलगी : फे्रजरपुरा ठाण्यात अपहरणाचा गुन्हा
अमरावती : पहिली ते दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेल्या एका आदिवासी मुलीला आई-वडिलांनी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यास बाध्य केले. मात्र, दहावीनंतर इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणे कठीण होत असल्याचे पाहून तिने चक्क पलायनच केले. हा प्रकार रुख्मिणी नगरातील आदिवासी वसतिगृहात २९ मार्च रोजी उघडकीस आला. याबाबत फे्रजरपुरा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली असता ती मुलगी शेगाव येथे आढळून आली.
मेळघाटच्या आदिवासी भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने लहानपणीपासून मराठी माध्यमात शिक्षण घेतले. दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला आई-वडिलांनी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्याचा तगादा लावला. तिने आई-वडिलांना मराठी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, आई-वडिलांनी तिला इंग्रजी माध्यमातच शिक्षण घेण्यास बाध्य केले. त्यामुळे तिने आई-वडिलांचे मन राखण्यासाठी अमरावतीमधील तंत्रनिकेतन शाखेत प्रवेश घेतला. रुख्मिणी नगरातील मुलींच्या आदिवासी वसतिगृहात राहून ती शिक्षण घेत होती. महाविद्यालयातील वर्गखोलीत जाऊन बसणे व शिक्षकांचे केवळ ऐकून घेणे, अशी दिनचर्या तिची सुरू होती. मात्र, इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेताना तिला काही कळेनासे झाले. घरच्यांना सांगितले, तर ते ऐकून घेणार नाही. काय करावे आणि काय नाही, अशी तिची मनस्थिीाी झाली होती. ती मानसिक तणावात होती. त्यामुळे तिने चक्क वसतिगृह सोडून पलायन करण्याचा बेत आखला आणि २९ मार्चच्या रात्री ती वसतिगृहाबाहेर पडली. एक मुलगी अनुपस्थित असल्याचे पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अधिकाऱ्यांनी त्या मुलीचा शोध सुरु केला. ती मुलगी बेपत्ता झाल्याचा हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळला. त्यांनी तत्काळ सूत्रे हलवित चौकशी सुरू केली. अखेर वसतिगृह अधिकाऱ्यामार्फत फे्रजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली. मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून लोकेशन घेतले. दरम्यान तीच्या मावस भावाचा शेंगाववरून फे्रजरपुरा पोलिसांना फोन आला. त्यावेळी ती मुलगी शेगावात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तिला बोलावून आई-वडिलांच्या स्वाधीन केले. इंग्रजीच्या भीतीने एका मुलीने पलायन केल्याचा गंभीर प्रकार लक्षात घेता, आई-वडिलांनी मुलांना त्यांच्या मताप्रमाणे शिक्षणाचे माध्यम निवडण्यास प्रोत्साहन दिल्यास असे प्रकार घडणार नसल्याची पोलीस वर्तळात सुरू होती. (प्रतिनिधी)

शासकीय वसतिगृहाची सुरक्षा वाऱ्यावर
आदिवासी मुलींना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनातर्फे शासकीय वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली खरी; पण तेथील सुरक्षा व्यवस्था ढासळल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. अशा काही घटना प्रकाशझोतात आल्याने शासकीय वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: She had fled from the fear of English education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.