लग्नासाठी तिने बदलविला धर्म !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST2021-06-27T04:10:13+5:302021-06-27T04:10:13+5:30
अरूण पटोकार पथ्रोट : मोर्शी तालुक्यातील एक आंतरधर्मीय नवदाम्तत्याला पोलिसांना संरक्षण द्यावे लागले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना ...

लग्नासाठी तिने बदलविला धर्म !
अरूण पटोकार
पथ्रोट : मोर्शी तालुक्यातील एक आंतरधर्मीय नवदाम्तत्याला पोलिसांना संरक्षण द्यावे लागले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून दिले. येथील आर्य समाज मंदिरात शुक्रवारी दुपारपासून पाच ते सहा तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी अन्य त्या मुलीने धर्मदेखील बदलविला.
मोर्शी नजीकच्या एका गावातील आंतरधर्मीय युगुलात प्रेम फुलले. समाज मान्यता देणार नसल्याने घरातून पलायन केले. पथ्रोट येथील आर्य समाज मंदिरात वैदिक पद्धतीने विवाह केल्यास कायदेशीर मान्यता मिळते, अशी माहिती मिळाल्याने ते दोघेही शुक्रवारी पथ्रोट येथे पोहचले. मंदिर व्यवस्थापकाने सज्ञान असल्याचे दाखले तपासून दंडाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रतिज्ञालेख करून घेतले. याची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयाला लागताच मुलीला त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
मंदिर व्यवस्थापकांनी तत्काळ पथ्रोट पोलिसांना माहिती देल्याने जमावास पांगविले. पोलिसांनी मुलीचा जवाब नोंदविला. नंतर धर्मांतर करून वैदिक सत्य सनातन पद्धतीने संस्कार करत मुलीचे नामकरण करण्यात आले. दोघांचे लग्न आर्य समाज मंदिरात पार पडले. परंतु कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.
त्या ठिकाणी मात्र मुलीने नातेवाईकांच्या दबावामुळे मुलासोबत जाण्यास नकार दिला. दुपारी १ वाजतापासून सुरू झालेले हे प्रकरण रात्री ८.३० वाजेपर्यंत ही संपले नव्हते. शेवटी पोलिसांनी मुलाच्या वडिलांनाही ठाण्यात बोलावून दोन्ही पक्षाकडून लेखी बयाण घेऊन त्यांना आपापल्या घरी सोडताना रस्त्यात अनुचित प्रकार घडू नये, पोलिसांनी त्यांना आपआपल्या घरी सोडले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन दंगानियंत्रण पथक व अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. ठाणेदार राहुल चौधरी, आर. एल. वसुकार, सुनील पवार, हेमंत येरखडे, ज्ञानोबा केंद्रे, सचिन सालफळे, राहुल काळपांडे, महिला पोलीस पुष्पा खडसे यानी नियंत्रणात ठेवली.
कोट
दोघांनी स्वमर्जीने कायद्यानुसार लग्न केले आहे. परंतु सध्या त्या मुलीला मुलाकडे जायचे नाही. असे ती सांगत असल्याने आम्ही तिचे बयान नोंदविले आहे.
सचिन जाधव,
ठाणेदार पथ्रोट