श्याम मुंबईय्याने केला हवेत गोळीबार
By Admin | Updated: November 24, 2014 22:49 IST2014-11-24T22:49:27+5:302014-11-24T22:49:27+5:30
रविवारी दुपारी चांदणी चौकात झालेल्या हवेतील गोळीबार प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून गोळीबार प्रकणातील चारही आरोपींना अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने

श्याम मुंबईय्याने केला हवेत गोळीबार
गोळीबार प्रकरण : चारही आरोपींना पाच दिवसांची कोठडी
अमरावती : रविवारी दुपारी चांदणी चौकात झालेल्या हवेतील गोळीबार प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून गोळीबार प्रकणातील चारही आरोपींना अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत असून अटकेतील आरोपींच्या घरांची झाडाझडती पोलिसांकडून सुरु आहे. श्याम मुंबईय्याने दहशत पसरविण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
चांदणी चौकात जुन्या वैमनस्यातून रविवारी दुपारी दोन गटात तणाव निर्माण होऊन भरदिवसा गोळीबार करण्यात आला. मात्र घटना घडल्यानंतरही गोळीबार झाला की नाही याबाबत संभ्रम होता. या घटनेत दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परांविरुध्द तक्रार दाखल केली आहे.