शशिभूषण उमेकर शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST2021-04-03T04:12:15+5:302021-04-03T04:12:15+5:30
वरूड/टेंभुरखेडा: टेंभुरखेडा येथील प्रगतिशील शेतकरी शशिभूषण भाऊराव उमेकर यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार घोषित करण्यात ...

शशिभूषण उमेकर शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
वरूड/टेंभुरखेडा: टेंभुरखेडा येथील प्रगतिशील शेतकरी शशिभूषण भाऊराव उमेकर यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार घोषित करण्यात आला. सेंद्रिय शेतीचे ते पुरस्कर्ते आहे. शेतीक्षेत्रात वरूड तालुका अग्रेसर आहे.
नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करणारे शेतकरी येथे आहेत. एकमेकांचे अनुकरण करून उत्पादन घेण्याची स्पर्धा येथील शेतकऱ्यांत असते. टेंभुरखेडा येथील शेतकरी शशिभूषण उमेकर हे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. शेतीक्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा असून, सेंद्रिय शेतीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने दखल घेतली असून, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.