धारदार शस्त्राने युवकाची हत्या

By Admin | Updated: July 3, 2015 00:31 IST2015-07-03T00:31:38+5:302015-07-03T00:31:38+5:30

नजीकच्या भिवकुंडी या गावाशेजारी पाटनाक्याजवळ एका २८ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला ...

The sharp weapon killed the young man | धारदार शस्त्राने युवकाची हत्या

धारदार शस्त्राने युवकाची हत्या

मोर्शी : नजीकच्या भिवकुंडी या गावाशेजारी पाटनाक्याजवळ एका २८ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना १ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.
भिवकुंडी हे गाव मध्यप्रदेशातील आठनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. गणेश महादेव कुमरे (२८) असे मृताचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी गणेश कुमरेच्या डाव्या कानाच्या व डोक्याच्या मध्यभागी धारदार शस्त्राने वार केले. त्याला मृतावस्थेत पाटनाका शाळेजवळ फेकून आरोपीने तेथून पळ काढला. काही वेळ गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याला उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती बुधवारी आठनेर पोलिसांना देण्यात आली. आठनेरचे पोलीस अधिकारी, मोर्शी ठाण्याचे ठाणेदार पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविला

Web Title: The sharp weapon killed the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.