शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सरसंघचालकांना पाण्यात पाहणारे शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक कसे?, नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 19:24 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. यावर भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी टीका केली आहे.

अमरावती - मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. या एकूणच संशयास्पद प्रकाराबाबत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी येथे 'लोकमत'शी बोलताना केली.

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी नाना पटोले हे अमरावतीत आले असताना त्यांनी भाजपाला हा घरचा अहेर दिला.  सरसंघचालक हे सन्मानाचे पद आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून श्रीकांत जिचकारांपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी जाहीर वक्तव्य करून सरसंघचालकांचा गौरव केला आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वयंसेवक असतो. ‘परिवार’ ही पक्षाची संकल्पना आहे. अशा व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे. 

अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी शरद पवारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले. आता १२ तारखेला पवार कर्जमाफीविरुद्ध मोर्चा काढताहेत. अमरावतीच्या मंचावरच पवारांनी फसव्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना खडे बोल का सुनावले नाहीत? सरकारला कुणी फसविले, असा माझा मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल असल्याचे पटोले म्हणाले. आपण पूर्वीपासूनच ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत आलो आहे. राज्य विचारावर चालायला पाहिजे; येथे तर सगळा संभ्रम आहे. त्यामुळे शेतक-यांच्या फसवणुकीसाठी भागीदारी कुणाची, असा टोला पटोले यांनी शासनाला लगावला.

बॅन असलेली कीटकनाशके राज्यात  कशी ?देशात ९३ कीटकनाशकांवर बॅन असताना राज्यात ती दाखल होतात कशी, विकली जातात कशी,  असा सवाल खा. पटोलेंनी उपस्थित केला. कीटकनाशकांच्या विषबाधेने ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक बळी गेले आहेत. शासननियुक्त ‘एसआयटी’ हादेखील एक फार्स आहे. विषबाधेची चौकशी करणा-या एसआयटीमध्ये या विषयाचा एकही तज्ज्ञ नाही. मृतांच्या वैद्यकीय परीक्षणात कीटकनाशकांचे अंश आढळत नाहीत. हा कुणाला वाचविण्याचा प्रकार आहे, असा सवाल पटोलेंनी केला.

श्वेतपत्रिका काढा, पारदर्शी कारभार दाखवा!राज्यात ९६ लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. त्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केले. प्रत्यक्षात चार हजार शेतक-यांनाच याचा लाभ मिळाला. कर्जमाफीसाठीचा पैसा जनतेचाच आहे. त्याचा विनियोग त्याच कारणासाठी व्हायला पाहिजे. हा निधी कर्मचा-यांचा पगार किंवा इतर कामासाठी नाही. त्यामुळे शासनाने या पैशांच्या विनियोगाची श्वेतपत्रिका काढावी व पारदर्शी कारभार दाखवावा, असे आवाहन पटोले यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवत